अटट्ल घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कामगिरी….!
लाल दिवा : नाशिक पोलीस आयुक्तालयात घडत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हयाचे अनुषंघाने घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीकोनातुन मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर व मा. पोलीस उपायुक्त सो. गुन्हे यांनी मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंघाने गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार समांतर तपास करत होते.
दिनांक ०६/०६/२०२१ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर येथे नेमणुकीस असलेले पो. ना. / १८८३ विशाल काठे यांना खात्रीशिर बातमी मिळाली की, घरफोडी चोरी करणारा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी इसम नामे हसन हमजा कुट्टी वय ४४ वर्षे हा नवनाथ नगर, पेठरोड पंचवटी येथे लपुन वास्तव्यास आहे. अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी वपोनि ढमाळ साो. यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / तोडकर, अंमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड अशांना मिळालेल्या बातमी प्रमाणे नवनाथनगर येथे सापळा लावुन त्यास त्याचे ताब्यातील पांढ-या | रंगाच्या होन्डा अॅक्टीव्हा मोपेड चालू करुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेतले. सदर आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांचेकडे सखोल विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह नाशिक शहरात ६ व नाशिक ग्रामीण हददीत ५ दुकानातील शटर वाकवुन घरफोडीचे एकुण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली.
नमुद आरोपी याचे कडुन चौकशीत नाशिक शहरातील १) आडगाव पोलीस ठाणे गु.र.नं. १९९ / २०२२ भा.द. वी कलम ४५४, ४५७, ३८० २ ) पंचवटी पोलीस ठाणे गु.र.नं. १६९/ २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० ३) पंचवटी पोलीस ठाणे गु.र.नं. ३११ / २०२२ मा. दवी कलम ४५४, ४५७, ३८० ४) म्हसरूळ पोलीस ठाणे गु.र.नं. ११ / २०२३ भा. द. वी कलम ४५४, ४५७, ३८० ५) मुंबईनाका पोलीस ठाणे गु.र.नं. २९ / २०२३ भा.द.वी. कलम. ३८० ६ ) भद्रकाली पोलीस ठाणे गु.र.नं. १९२ / २०२२ भा. द.वी. कलम. ४५७, ३८० ७) नाशिक तालुका पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण गु.र.नं. १८३ / २०२३ भा. द. वी कलम ४५७, ३८०, ३४ ८) वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण गु.र.नं. २२१ / २०२३ भादवी कलम ४५७, ३८० ९) वाडीव-हे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण गु.र.नं. १० / २०२३. भा. द. वी कलम ४५४, ४५७, ३८० १०) वाडीव-हे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण गु.र.नं. ६४ / २०२३ भा. द. वी कलम ४५४, ४५७, ३८० ११ ) वाडीव-हे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण गु.र.नं. २१० / २०२२ भादवी कलम ४५७, ३८० हे ११ गुन्हे उघडकीस आले आहे, सदर आरोपीकडुन एकुण १,१६,०९०/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी नामे हसन हमजा कुटट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द १४ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत., असे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापुर्वी पंचवटी पोलीस ठाणे गुरनं २६७ / २०१८ भादविक ४५४, ४५७, ३८० या घरफोडीच्या गुन्हयात दोषसिध्दी होवुन शिक्षा लागलेली आहे.
सदर आरोपी हा दारूची दुकाने, किराणा मालाची दुकाने, कपडयाचे दुकाने यांची घरफोडी करून त्यातील रोख रक्कम चोरी करतो. तपासात सदर आरोपीने सोलापुर व मध्यप्रदेशातील शिंदवाडा येथेही ७ ते ८ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे, सदर बाबत व त्याचे साथीदारा बाबत अधिक तपास करीत आहोत.
सदर आरोपी नामे हसन हमजा कुट्टी यास जप्त मुद्देमालासह आडगांव पोलीस स्टेशनकडील | गुरनं. १९९ / २०२२ भादविक ४५४, ४५७, ३८० या गुन्हयाचे पुढील तपास व कारवाई कामी आडगांव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, सो. गुन्हे, मा. श्री. वसंत
मोरे, सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हैं मत तोडकर, पोलीस उप निरीक्षक श्री. विष्णु उगले, चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, शरद सोनवणे यांनी केलेली आहे.