85 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट -2 ची कामगिरी…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१८ :- गुन्हे शाखा कडील नेमणुकीचे पो.हवा. प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक इसम विना नंबरची बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही.एन.नाईक कॉलेज समोर येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने *सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव ,राजेंद्र घुमरे, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी,अशांनी सापळा कारवाई करून इसम नामे प्रतीक संजय गोसावी वय-20 वर्ष रा. स्वामी विवेकानंद नगर,गणपती मंदिराजवळ प्लॉट नंबर 43, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक यास बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्यास अधिक चौकशी करता त्याने त्याचा साथीदार नामे संकेत राजेंद्र बैरागी रा. स्वामी विवेकानंद नगर, जयश्री किराणा दुकानाजवळ, मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक अशांनी जिजाऊ मंगल कार्यालय मनमाड येथून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणे मनमाड पो.स्टे.ला गुन्हा रजि .नंबर 435 /2023 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 19/10/2023 रोजी गुन्हा दाखल आहे
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, राजेंद्र घुमरे, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर,यांनी केली आहे..