बापरे ! नाशिक ग्रामीण च्या दोन पोलिसांना लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…!
लाल दिवा-नाशिक,ता .१४ : “घोटी” लोकसेवक कैलास रामदास गोरे, पोलीस नाईक, तत्कालीन नेमणुक महामार्ग पोलीस केंद्र, घोटी. मुळ नेमणुक नाशिक ग्रामीण.२ लोकसेवक संतोष उत्तम माळोदे, पोलीस नाईक, तत्कालीन नेमणुक महामार्ग पोलीस केंद्र, घोटी. मुळ नेमणुक नाशिक ग्रामीण.लाचेची मागणी रक्कम २० हजार रुपये तडजोड अंती १५ हजार रुपये दिनांक १९/०५/२०२३
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर हा मुंबई दिशेकडून इगतपुरी दिशेकडे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरून जात असताना सदरील ट्रेलर यास कसारा येथील घाटातुन ईगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देवुन सदरील घाट ओलांडुन पार करुन देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक. १ यांनी पंचांसमक्ष २०, हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदर घाट पार करुन महामार्ग पोलीस केंद्र, घोटी ता. इगतपुरी येथे आल्यावर आरोपी लोकसेवक क्र. २ यांनी तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारण्याचे मान्य केले. म्हणुन आरोपी लोकसेवक क्र. १ व आरोपी लोकसेवक क्र. २ यांचेवर इगतपुरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ सह भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.