उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली…….. शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट….!

लाल दिवा : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना सर्वत्र दिसत आहे. अशातच राज्यातील राजकारण देखील दररोज तापतांना दिसत आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी चांगले चिडल्याचे दिसून येत आहे. मग काय त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी तर उद्धव ठाकरे यांचा समाचार घेताना चांगलीच आगपाखड केल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांनी केलेल्या टीकेची सर्वत्र चर्चा होत आहे. तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे.

 

    माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सांगितले की, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबत बोलताना जनाब उद्धव ठाकरे एकेरीवर आलेत. जेव्हा माणूस पराभवाच्या खात्रीने घाबरतो त्याच वेळेला सुसंस्कृतपणा सोडतो. देवेंद्रजींनी फक्त एक राजकीय गोष्ट उघड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही अवस्था आहे, आमच्याकडे असलेल्या इतर गोष्टी उघड केल्यावर ती उद्धव ठाकरे आपली राजकीय आणि सार्वजनिक कारगिर्द संपेल हे लक्षात ठेवा एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे नाक घासण्यासाठी मध्यस्थ पाठवायचे आणि दुसरीकडे मर्द म्हणत असा राजकीय नामर्दपणा करायचा उद्धव ठाकरे आता आपण कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलं आहे कमरेखाली बोलण्याची सुरुवात आपण केली आहे. हे लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र म्हणून आपल्या बाबतीत आम्ही टीका करताना संयम बाळगत होतो. पण आमच्या नेत्यांचा एकेरीत उल्लेख कराल तर राजकीय कंबर मोडली आहेच. खरी खुरी कंबरही मोडून घ्यायची असेल तर तयारी ठेवा. महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेत घ्यायच्या ती रस्त्यावरचा संघर्ष करायचा. हे ठरवा. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यापुढे ही अशी भाषा सहन करणार नाहीत. त्यामुळे जनाब उद्धव ठाकरे यापुढे बोलताना तोंड सांभाळून बोला अशा पद्धतीचा समाचार अजित चव्हाण, सहमुख्य प्रवक्ता,भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांनी घेतला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!