अज्ञात क्रमांकांवरील कॉल्सपासून सावधान! ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ फिचरने करा स्वतःचे संरक्षण

डिजिटल सुरक्षेत नाशिककरांना सज्ज करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

लाल दिवा-नाशिक, दि.४:-(प्रतिनिधी) -शहरात सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. अज्ञात क्रमांकांवरून येणारे व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स हे डिजिटल अटक, कुरिअर फसवणूक आणि इतर अनेक फसवणुकीचे साधन बनले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक या फसवणुकीचे सहज बळी पडत आहेत.

या पार्श्वभूमीवर, नाशिक शहर पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ या फिचरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हे फिचर अज्ञात क्रमांकांवरून येणारे कॉल्स आपोआप ब्लॉक करण्यास मदत करते. 

“हे फिचर वापरल्याने अनावश्यक कॉल्सपासून सुटका मिळते आणि सायबर गुन्हेगारांना बळी पडण्याची शक्यता कमी होते. हे फिचर अॅक्टिव्हेट केल्यास अज्ञात क्रमांकांवरून येणारे कॉल्स तुमच्या फोनवर वाजणार नाहीत. मात्र, ते कॉल्स तुमच्या कॉल लिस्टमध्ये दिसतील, ज्यामुळे तुम्ही कोणताही महत्त्वाचा कॉल मिस करणार नाही,” अशी माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी, या फिचरचा वापर करावा आणि सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

  • सायलन्स अननोन कॉलर्स’ फिचर कसे ॲक्टिव्हेट करावे?
  • 1. तुमच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  • 2. उजवीकडे असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
  • 3. ‘सेटिंग्ज’ वर जा.
  • 4. ‘अकाउंट’ वर क्लिक करा.
  • 5. ‘प्रायव्हसी’ निवडा.
  • 6. ‘कॉल्स’ वर टॅप करा.
  • 7. ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ हा पर्याय ॲक्टिव्हेट करा.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!