चांदवड चंद्रेश्वरगड : श्रावण समाप्तीनिमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन…!
लाल दिवा-चांदवड,दि.३१ : सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे भगवान चंद्रेश्वर महादेव, श्री चंद्रेश्वरी माता, श्री चंद्रेश्वरबाबांच्या कृपाशीर्वादाने, स्वामी बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात ‘श्रावणमास समाप्ती’ निमित्त ‘महाप्रसाद / भंडारा’ मंगळवार, दिनांक – ०३ सप्टेंबर २०२४रोजी चांदवडच्या चंद्रेश्वरगड येथे आयोजित केला आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1