बदलापूर पाठोपाठ. नाशिक मध्ये पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर क्लास चालकांकडून अत्याचार. …… नागरिकांमध्ये प्रचंड संताप ….!
लाल दिवा….. एकीकडे बदलापूरचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे नाशिक मधील सिडको परिसरात असलेल्या एका खाजगी क्लास चालकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिडकोवासियामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिडको येथील उपेंद्र नगर परिसरात खाजगी क्लास चालकाने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवईन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी अंगलट करून स्त्री मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्यामुळे अंबड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपेंद्र नगर येथे एक खासगी क्लास आहे. संशयीत क्लासचा चालक, शिक्षक वय ३२ याने पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्या मागे येऊन अंगलट केले. सदर बाब मुलीने तिच्या पाल्यांना सांगितल्यानंतर पाल्यांच्या फिर्यादीहून अंबड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे काम करीत आहे.