आरोग्यदूत तुषार जगताप यांची गुटखा प्रकरणातून निर्दोष मुक्तता;इगतपुरीच्या पोलिसांचा गुन्हा न्यायालयाकडून रद्द;

षडयंत्रकिंग एकनाथ खडसे तोंडावर आपटल्याची प्रतिक्रिया

नाशिक :प्रतिनिधी

गुटखा वाहतूकप्रकरणी सूडबुद्धीच्या कारस्थानाचे बळी ठरलेले आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्या.राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.या निकालाने या प्रकरणामागचे षडयंत्र किंग एकनाथ खडसे यांना चांगलीच चपराक बसल्याची, प्रतिक्रिया व्यक्त करून हा सत्याचा विजय असल्याचे तुषार जगताप यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

इगतपुरी पोलिस ठाण्यात 11नोव्हेंबर 2021रोजी महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखूजन्य अमलीपदार्थ गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला होता.त्या गुन्ह्याप्रकरणी म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर 6 मे 2024रोजी जगताप यांना अटक करून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांसमोर पोलिसांकडून जगताप यांच्या रिमांडसाठीचा युक्तिवाद उडवाउडवीचा आणि तोंडी बोलण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले.तसेच जगताप यांना दोन वर्षाच्या कालावधीनंतर अटक का केली? याबाबत ठोस कारण पोलिसांना देता आले नाही. तसेच या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करता न आल्याने,कोणत्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली त्याचदिवशी न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले होते.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना तुषार जगताप 6 मे2024 रोजी कुठलीही पूर्व कल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक गोवण्यात आले होते.या गुन्ह्यातील पोलिसांची कारवाई पूर्णता बेकायदेशीर असल्याने मुदत संपूनसुद्धा दोषारोपत्र कोर्टात दाखल करत नव्हते,असे तुषार जगताप यांचे म्हणणे आहे.त्यासंदर्भात वारंवार पोलिसाशी पत्रव्यवहार करण्यात आला.माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून त्यातून माझे नाव वगळावे अथवा माझ्यावरील दाखल गुन्ह्यातील पुरावे,कागदपत्रे न्यायलयात सादर करावीत अशी विनंती मी सातत्याने करीत होतो.तरीसुद्धा पोलिसांकडून वेळकाढूपणाची भूमिका कायम राहिल्याने यासंदर्भात दाद मागण्यासाठी मी न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर पोलिसानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.11नोव्हेंबर 2021ला ज्या वाहनांत गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल माझा होता असा कोणाचाही माझ्याविरुद्ध आरोप नाही.तसेच फिर्यादीत माझे नांवदेखील नाही. फिर्याद ही दि.11नोव्हेंबर 2021 रोजी दाखल असून मला या सदर गुन्ह्यात दोन वर्षांनंतर म्हणजे 2023 मध्ये खोटेपणाने गोवण्यात आलेले. सदर दोषारोपत्रात माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही. मला विनाकारण सदरच्या खटल्यास सामोरे जावे लागले. व त्यातून मला मानसिक वेदना होतील असा युक्तिवाद माझ्यातर्फे करण्यात आला होता. न्यायदेवतेने सर्व बाबीचा विचार करून सदर खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून माझ्याविरुद्ध करण्यात आलेला 6 मे 2024चा गुन्हा रद्दबातल ठरवून न्या.राठी यांच्या न्यायालयाने या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिलेत, असेही जगताप यांनी सांगितले.या खटल्यात जगताप यांच्यातर्फे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. राहुल कासलीवाल यांनी काम बघितले.

 

  •              हा तर सत्याचाच विजय

गुन्हा नव्हे, षडयंत्रच!

मंत्री महोदय गिरीष महाजन आणि भाजपला बदनाम करण्यासाठी सतत संधी शोधणारे एकनाथ खडसे यांनी आमचा बळी देण्याचीही एक संधी घेऊन पाहिली. प्रसार माध्यमांना वारंवार खोटी माहिती देऊन, पोलिसांना फोनवरून धमकीच्या सुरात दबाव टाकून आमच्याविरुद्ध तो गुटख्याचा कथित गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले.

सत्य परेशान जरूर झाले. मात्र विजयी झाले. सन्माननीय न्याय देवतेने वास्तव समजून घेतल्यानंतर आमच्या विरुद्धचा “तो”गुन्हाच रद्दबातल ठरवला.

धन्यवाद न्यायदेवता!ते षडयंत्रच होते. आमच्या या भावनेवर न्यायदेवतेच्या या निकालाने शिक्कामोर्तब झाले.नैसर्गिक न्यायाने पाताळ यंत्री प्रवृत्ती ठेचल्या गेल्या. भविष्यात कुणाही निर्दोष व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करण्याची कुटील बुद्धी ना सुचो, एवढ्याच त्यांना शुभेच्छा!!

 

– आरोगयदूत डॉ.तुषार जगताप

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!