व्यापारी बँकेच्या मैदानावरून अरिगळेची भाजपा तिकिटासाठी लॉबिंग ; अजित पवार गटाकडून भाजपात सक्रिय…..निवृत्ती अरीगळे भाजपच्या वाटेवर ? चर्चांना उधाण !
निवासी संपादक -भगवान थोरात मो.८८८८७७२८८८
लाल दिवा-नाशिक,ता.१९ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिगळे यांनी भारतीय जनता पक्षाकडून तिकिटासाठी व्हाया अजित पवार गटामार्फत मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. म्हणून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक लोकसभेसाठी सध्या इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक मध्य इगतपुरी सिन्नर त्रंबक आणि देवळाली यांचा समावेश होतो. सध्या नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघात सध्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्येच यंदाच्या वेळी भारतीय जनता पक्ष व शिंदे गट युतीमध्ये नाशिक मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिक मतदार संघात भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढत आहे. मात्र इलेक्टिव्ह मेरिट असणारा उमेदवार सध्या भारतीय जनता पक्ष शोधत आहे.
येणाऱ्या लोकसभेत नवीन चेहरा असायला हवा. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक इच्छुक सध्या मोर्चे बांधणी सुरू करीत आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन बाबुराव ठाकरे हे शरद पवारांचे खंदे समर्थक समजले जात असले तरी ते भाजपच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या अजित पवार गटात असणारे ज्येष्ठ नेते निवृत्ती आरिंगळे सध्या भाजपा च्या वाटेवर जात असल्याची चर्चा आहे. म्हणून त्यांच्या पक्षांतराची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे हा मतदारसंघ येणारा कुंभमेळा आणि हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला सुटणार अशी शक्यता आहे. व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरींगळे यांनी भाजपाच्या तिकिटासाठी अजित पवार गटाकडूनच फिल्डिंग लावणे सुरू आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही साकडे घातल्याचे बोलले जात आहे.
- वरिष्ठ नेत्यांना साकडे
नाशिक लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे हा मतदारसंघ येणारा कुंभमेळा, राममंदिर, धार्मिक नगरी आणि हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर भाजपला सुटणार अशी शक्यता आहे. व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी भाजपच्या तिकिटासाठी अजित पवार गटाकडूनच फिल्डिंग लावणे सुरू आहे. यासाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही साकडे घातल्याचे बोलले जात आहे. भाजप सध्या इलेक्टिव्ह मेरिट, चारित्र्य, शिक्षण नवा चेहऱ्याबरोबरच उमेदवाराची लोकाभिमुखता असणारे उमेदवाराचा शोध घेत आहे.
- जमेची बाजू
महाविद्यालयीन जीवनापासून निवृत्ती महाराज अरीगळे
राजकारणात सक्रिय आहे. तीन वेळा बिटको कॉलेजचे जीएस त्यानंतर दहा वर्ष बिटको कॉलेजच्या जीएस पदाची सत्ता एक हाती अरिंगळे यांच्या हातात होती. नाशिक महानगरपालिका नगरसेवक ते स्थायी समिती सभापती व नासिक रोड मधील अग्रगण्य सहकारी बँक दि नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे पॅनल संस्थापक म्हणून गेल्या 32 वर्षापासून त्यांनी व्यापारी बँकेत निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून त्यांनी 33 वर्ष सेवा केलेली असून उच्चविद्याविभूषित पांढरपेशा विचारसरणीमुळे अरीगळे यांनी लावलौकिक मिळवला आहे. आज पर्यंत निवृत्ती अरीगळे यांच्यावर एकही केस नाही ,अगर गुन्हा दाखल नाही. शिवाय सुशिक्षित उच्चशिक्षित नागरी समस्यांची जाण असणारा नवीन चेहरा लोकसभेसाठी नाशिककर स्वीकारतील असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.