कट्टर हिंदुत्ववादी नेते आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या वक्फ बोर्डाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य अशा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन……!
लाल दिवा-नाशिक,ता.१० :- वक्फ बोर्डाच्या विरोधात रविवारी (ता. ११) सांयकाळी चार वाजता बी. डी. भालेकर हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार नीतेश राणे, काजल हिंदुस्थानी, सुरेश चव्हाणकेयांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. सकल हिंदू समाजाच्या म्हणण्यानुसार नाशिकमध्ये ८५ एकर जागेवर वक्फ बोडनि हक्क सांगितला असून त्या जागेवर सध्या नाईक कॉलेज असून तिथे तीन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे. त्या परिसरात नामांकित रुग्णालयासह तीस हजारापेक्षा जास्त कुटुंबांची पक्की घरे अनेक वर्षांपासून आहेत. अशा जागेवर वक्फ बोडनि हक्क सांगून जागा हस्तांतर करण्याची प्रक्रियेची मागणी केली आहे. अशाच पद्धतीने नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात दोन हजार एकरपेक्षा जास्त जागेवर दावा करण्यात आलेला आहे. सध्या नाशिक विभागात ८५०० एकर जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. वक्फ बोर्डाला १९९५ च्या कायद्यात २०१३ साली केंद्र सरकारकडून बदल करण्यात येऊन एकतर्फी संविधान विरोधी अधिकार देण्यात आले. दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यात येऊन जमिनीवर अतिक्रमण करून जागा बळकावल्या जात आहे. वक्फ बोर्डाला दिलेले हक्क रद्द करण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भद्रकाली, जुने नाशिक, सरकारवाडा, काठेवाडी, पाथर्डी, नाशिक रोड, गंगापूर रोड येथील जागेवर वाढीव बांधकाम, धार्मिक अतिक्रमण, पिढ्यानपिढ्या राहत असलेली घरे, जागा यावरील वक्फ बोर्डाने हक्क सांगू नये तसेच त्यांनी हक्क सांगितलेल्या जागा मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे….