सेक्स रॅकेट’मध्ये अडकला नेता, क्षीरसागरला दोन दिवसांची पोलीस कोठडी!

लाल दिवा-नाशिक,दि.८:-छत्रपती संभाजीनगर रोड शहरातील कपालेश्वर नगरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील इमारतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. [पक्षाचे नाव] पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर यांच्या घरात कुंटणखाना चालवल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने क्षीरसागर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणात आणखी राजकीय नेते सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी जफर मन्सुरी नावाच्या एका व्यक्तीला आणि एका महिलेला ताब्यात घेतले. तसेच दोन तरुणींना या कुंटणखान्यातून सोडवण्यात आले. 

आडगाव पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला पवन क्षीरसागर याच्या आशीर्वादानेच हा कुंटणखाना चालवत असल्याचे समजले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन क्षीरसागर हा या घराचा मालक नसून भाड्याने राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून येथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि ही कारवाई केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!