नाशिकरोडमध्ये दलित महिलेवर पाच वर्षे अत्याचार; व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल, आरोपीला अटक

नाशिक हादरले! दलित महिलेवर पाच वर्षे अत्याचार, बनावट आधारकार्डचा वापर; नराधमाला अटक

लाल दिवा-नाशिकरोड,दि.४ – नाशिकरोडमध्ये एका दलित महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एका नराधमाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय हरिप्रसाद कनोजी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेने दिलेल्या धक्कादायक तक्रारीनुसार, आरोपी कनोजीने २०१९ मध्ये तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्याने या अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गेली पाच वर्षे ब्लॅकमेल करत होता.

पीडितेने आपल्या तक्रारीत असाही धक्कादायक आरोप केला आहे की कनोजीने वेळोवेळी तिच्या घरी, कारमध्ये, हॉटेलमध्ये, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि वैतरणा धरण येथे नेऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तो तिच्या पतीच्या नावाचे बनावट आधारकार्ड बनवून हॉटेलमध्ये राहण्यासाठी देखील वापरत होता. इतकेच नाही तर आरोपीने तिच्या जातीविषयी अत्यंत आक्षेपार्ह शिवीगाळ देखील केली.

या प्रकरणी पोलिसांनी कनोजीविरुद्ध भा.दं.वि. कलम ६४ (१), ६४ (२) (डी), ६८ (सी), ३३६ (३), ३५१, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४४, ४५, ४६, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (जी), झेड (१) (५), ३ (२) (अ) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ई)  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपायुक्त बारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!