मंत्री छगन भुजबळ यांचा गजू घोडके यांना फोन येताच …….घोडके यांनी उपोषण घेतले मागे……..!
नाशिक- ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी नाशकात आंदोलन छेडणारे ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.जरांगे पाटलांनी
अंतरावली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनात शह देण्यासाठी गजू घोडके यांनी उपोषण सुरू केले होते.मात्र जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतल्याने आपणही उपोषण सोडत असल्याचे गजू घोडके यांनी पत्रकात नमूद केले आहे.
जरांगे पाटलांच्या मनात ओबीसी समाजाबद्दल कमालीचा द्वेष आहे हे लपून राहिलेले नाही.उठसूट आंदोलनाची धमकी देऊन मराठा समाजाच्या हिताचे धोरण राबवायचे पदरातआणि काही पडले की आंदोलन थांबवायचे हा जरांगे पाटील यांचा जणू धंदाच बनला आहे.लोकसभेच्या जागा लढविण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली होती. मात्र मराठा समाजाच्या हिताचे धोरण दिसताच त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतले ओबीसी समाजाच्या उमेदवारांना पाडण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे धोरण आम्ही राबवू, असा इशाराही घोडके यांनी पत्रकात दिला आहे. बारा बलुतेदार सुद्धा सक्षमपणे नेतृत्व करू शकतात. परंतु त्यांना डावलण्याचा प्रयत्न कोण करते ही बाब लपून राहिलेली नाही. मराठा समाजाने जनरल आणि ओबीसी या दोन्ही जागांवर दावा सांगून ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय करीत आहे.परंतु यापुढे आम्ही हा अन्याय खपून घेणार नाही,असे घोडके यांनी कोणी नमूद केले आहे.घोडके यांच्याबरोबर नाना पवार,दिलिप देवरे, प्रदिप सोनवणे,प्रविण पोतदार,किरण जाधव,राजाभाऊ सोनार,
सुनील दुसाने हे सुद्धा उपोषणास बसले होते हरिओम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश विसपुते यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन या सर्वांनी उपोषण सोडले.
ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांनी गजू घोडके यांच्या लढवय्या भूमिकेचे फोनवरून तोंडभरून कौतुक केले. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आपण जे कार्य करीत आहात त्याचे ऋण समाज कदापि विसरणार नाही, असे भुजबळ यांनी घोडके यांच्याशी फोनवरून संवाद साधतां ना सांगितले.