अखिल भारतीय मराठा महासंघ…….मराठा क्रांती मोर्चा…….शिवजन्मोत्सव समिती यांच्यातर्फे……..जरांगें पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा रविवारी नाशकात मोफत शो……!
लाल दिवा : मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान देऊन समाज जागृतीची महत्वाची भूमिका बजविणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित संघर्षयोद्धा हा चित्रपटाचा मोफत शो जय शिवराय उद्योग समूहाचे चेअरमन आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या सौजन्याने रविवार १६ जून रोजी दुपारी ३ वाजता सिटी सेंटर मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व शिवभक्तांनी चित्रपट पाहण्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठा महासंघ,मराठा क्रांती मोर्चा आणि शिवजन्मोत्सव समिती यांच्यातर्फे करण्यात आले. तिकिटांसाठी गौरव गोवर्धने,सतनाम राजपूत,विलास जाधव,सचिन पवार,मंगेश धनवटे,वीरेंद्र भुसारे, शाहू पवार,कुणाल भवर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.मोफत तिकीट मिळवण्यासाठी भ्रमणध्वनी 8605839961 या कमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.