अट्टल गुन्हेगार उचलला ! खुनी हल्ला व जाळपोळ तील म्होरक्या असणारा जेलरोड पिंपळपट्टीतील……. निखील उर्फ स्वप्नील बोराडेच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या …!
गुन्हे शाखा युनिट-१ चे सुगन साबरे, मिलींदसिंग परदेशी यांची धडाकेबाज कामगिरी…!
लाल दिवा : नाशिकरोड पोलीस ठाणे कडील गुरनं २२८/२०२४ भादवि कलम ३०७, ४३६, ५०६ प्रमाणे (दि.१९) एप्रिल २४ रोजी दाखल आहे.
सदर गुन्हयातील इतर पाहिजे आरोपीतांचा शोध घेणेबाबत संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिलेल्या होत्या. तसेच प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपीतांचा शोध घेत पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी निखील उर्फ स्वप्नील बोराडे हा हिंजवडी पुणे येथे असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरीष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोना मिलींदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, समाधान पवार अशांचे पथक तयार करून रवाना केले. सदर पथकाने मिळालेल्या बातमीवरून निखील उर्फ स्वप्नील संजय बोराडे, वय-२३वर्षे, रा-पिंपळ पट्टीरोड बोराळेमळा भगवती लॉन्स समोर, जेलरोड नाशिकरोड नाशिक यास सापळा लावुन कल्पतरू सोसायटी, किर्ती हाईटस श्रीरामचौक, हिंजवडी पुणे येथे पकडुन ताब्यात घेतले व त्यास गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर पाहिजे आरोपीतास पुढील कारवाई कामी नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक., प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोउनि/सुगन साबरे, महेश साळुंके, मिलींदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, समाधान पवार अशांनी केलेली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1