निवृत्त सैनिकाने पूर्ण केल्या 101 मॅरेथॉन , धावपटूंकडून कौतुक ….!
लाल दिवा-नाशिक रोड,ता .२२ :- इगतपुरी तालुक्यातील मुळगाव दौंडत येथे राहणारे सुप्रसिद्ध धावपटू भाऊसाहेब बोराडे या माजी निवृत्त सैनिकाने सेवा निवृत्ती नंतर 101 मॅरेथॉन पूर्ण करत ‘ रन फॉर आर्मी ‘ हा मूलमंत्र दिला आहे.
वीस वर्ष सैन्य दलात सेवा करून भाऊसाहेब बोराडे हे घोटी येथे दरवर्षी 26 / 11 ला शहिदांच्या स्मृती जागवण्यासाठी मॅरेथॉन भरवत असतात या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातील 1000 हून अधिक खेळाडू धावतात. रन फॉर इंडियन आर्मी अशी दरवर्षी टॅग लाईन असते. सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भाऊसाहेब बोराडे यांनी 101 मॅरेथॉन करत 26/ 11 ला मुंबई येथे शहीद झालेल्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य दिव्य अशा मॅरेथॉनच्या आयोजन करीत असतात. मविप्र मॅरेथॉन, नाशिक महापौर मॅरेथॉन, दिल्ली पुणे ठाणे येथे अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत बोराडे यांनी बक्षिसे जिंकली आहेत. घोटी येथे गरीब विद्यार्थ्यांना मॅरेथॉनचे प्रशिक्षण मिळावे म्हणून दोन एकर जागेमध्ये त्यांनी रनिंग ट्रॅक तयार केला आहे.