आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा ॲक्शन मोडवर…… आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी…..शासकीय व सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण होऊ नये…… यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे….!

लाल दिवा-नाशिक,ता.८ :- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने शासकीय व सार्वजनिक परिसरातील मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि परिसराचा गैरवापर तसेच खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे सर्व संबंधित शासकीय, निमशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष, उमेदवार यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

भारत निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करतांना शासकीय व सार्वजनिक परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी मालमत्तेचे विद्रुपीकरण याबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

अशा आहेत निवडणूक आयोगाच्या सूचना….

➡️ कुठल्याही शासकीय जागेत (शासकीय इमारती, शासकीय इमारत ज्या जागेत आहे त्या जागा) भिंत रंगवणे, लेखन करणे, पोस्टर्स बॅनर्स चिकटवणे, झेंडे लावणे, कटआऊट्स, होर्डीग्ज उभारणे, या सारख्या प्रकाराने विद्रूपीकरण करता येणार नाही.

 

➡️ सार्वजनिक उपक्रमांचे इमारतींच्या जागा, शासकीय इमारती, जागांसाठी ज्या तरतुदी लागू आहेत, त्याप्रमाणेच तरतुदी निवडणूक कालावधीत लागू रहातील. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आदर्श आचारसंहिता लागू असतांना कुठलीही राजकीय जाहिरात सार्वजनिक उपक्रमांचे मालकीचे इमारतींवर, जागेत प्रदर्शित करता येणार नाही. 

 

➡️ खाजगी जागांवर, घरांवर झेंडे लावणे, बॅनर्स, पोस्टर्स लावतांना संबंधित जागा मालकाची परनावगी घेऊन लावता येतील. तथापि, असे झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशी जाहिरात करतांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जागा मालकाची संमतीची प्रत सादर करण्यात यावी. राजकीय स्वरूपाची जाहिरात, झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स प्रदर्शित करण्याबाबत संबंधित जागा मालकाने स्वखुशीने संमती दिलेली असावी, यासंदर्भात जागा मालकाकडून धाक-दपटशाही किंवा बळजबरीने अशी संमती घेता येणार नाही.

 

➡️ मोटार वाहन कायद्यानुसार खाजगी वाहनावर स्टीकर, झेंडा इ. संबंधित वाहन मालकांना स्वतःच्या जबाबदारीवर इतरांना त्रास न होता लावता येईल. तथापी खाजगी वाहनावर लावलेले असे झेंडे, स्टीकर एखाद्या विशिष्ट उमेदवारास मत द्यावे, या उद्देशाने प्रचारासाठी लावले असेल तर अशा वेळी आय.पी.सी. 171 एच (निवडणूकीसंदर्भात प्रचारासाठी केलेला बेकायदेशीर खर्च) नुसार कारवाई करण्यात येईल.

 

➡️ व्यावसायिक वाहनांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून विहित परवानगी घेऊन वाहनांवर स्टीकर, झेंडा इ. प्रदर्शित करता येईल. तथापी याबाबतची परवानगी त्या वाहनांवर पुढील काचेवर दर्शनी भागावर लावावी लागेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!