बदलीसत्र : पोलीस निरीक्षक ढमाळ यांची पिंपरी चिंचवड येथे बदली….. युनिट १ ला अनिल शिंदे तर २ ला सोहन माछरे यांची नियुक्ती …..!
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.
यात पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के.एम. मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी राज्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या विनंतीने पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार, नाशिक पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांची पसंतीनुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे. तसेच मुंबई शहरातील निरीक्षक अशोक घुगे यांची नाशिक ग्रामीणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
ढमाळ यांनी नाशिक शहरात मुंबई नाका पोलिस ठाणे व गुन्हे शाखेत दमदार कामगिरी केली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
मुथ्थूट फायनान्स दरोडा, पारख अपहरण, एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड करून त्यांची पाळेमुळे शोधणे, खुन, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी यासारख्या गुन्ह्यांचीही उकल त्यांनी केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचीही जबाबदारी त्यांनी यापूर्वी पार पाडलेली आहे.
शिंदे, माछरे यांची नियुक्ती
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विजय ढमाळ यांची बदली झाल्याने युनिट एकची जबाबदारी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर युनिट दोनच्या पोलीस निरीक्षकपदी सोहन माछरे पो निरीक्षक विजय विष्णु पगारे गुन्हे शाखा, युनिट क्र.२, नाशिक शहर .. बदली गुन्हे शाखा, युनिट क्र.१, नाशिक शहर (दुय्यम)यांची नियुक्ती करण्यात आली आहे