आश्चर्यम : पाण्याच्या थेंबानी बनलेल्या लक्ष्मी पावलाचे दर्शन घेण्यासाठी सिडकोत तोबा गर्दी …..!
लाल दिवा-नाशिक,ता.१४ : सध्या मार्गशीर्ष महिन्याचे उपवास सुवासिनी महिला भगिनींकडून केले जात आहे. असे असताना उत्तम नगर भागात एका महिलेला उपवास केल्यानंतर चक्क पाण्याच्या एका थेंबातून लक्ष्मीच्या पावलांचे दर्शन झाल्याचे चित्र दिसून आले आहे. संपूर्ण सिडको परिसरात चर्चेचा विषय झालेला आहे. या पाण्याच्या थेंबातून म्हटलेल्या पावलाचे दर्शन घेण्यासाठी उत्तम नगर येथील एका महिलेच्या घरी महिला भगिनींनी गर्दी केली आहे.
सिडको परिसरात राहणाऱ्या प्रियंका वाणी या गृहिणीने मार्गशीष महिन्याचे गुरुवार चे उपवास केले. गेल्या वर्षानुवर्षांपासून सदर महिला मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करीत आहे. यंदा मात्र या उपवासातून आल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा उपास सोडण्यापूर्वी देवघरात देवाला नैवेद्य दाखवत असताना चक्क पाण्याच्या थेंबापासून लक्ष्मीचे पाऊल उमटले. यानंतर सदर महिलेने लक्ष्मीचे पावले उमटले असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले. लक्ष्मीचे पाऊल बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच महिला वर्गाने प्रियंका वाणी यांच्या घरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे सदर पाण्याच्या थेंबापासून उमटलेले पाऊल नेमकी कशामुळे उमटले याबाबत संपूर्ण परिसरात तर्कवितर्क लावले जात आहे. तरी देखील महिला भाविकांनी मार्गशीष महिन्याचे उपवास केल्यामुळे लक्ष्मी दर्शन दिले. अशी भावना महिला भाविकांमध्ये चर्चा सुरू आहे.
गेल्या मार्गशीर्ष महिन्यात बहुतांशी महिला उपवास करत असतात. याच काळात उपवासकर्त्या महिला भगिनींना वेगवगळे अनुभव येत असतांना यावर्षी सिडको परिसरातील प्रियंका वाणी यांच्या देवघरात पाण्याच्या थेंबातुन लक्ष्मीचे पाउले उमटल्याने महिला भाविकांनी गर्दी केली असली तरी याबाबत अंध श्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिका-यांनी याबाबत आवाहन स्विकारले आहे.