पालकमंत्र्यांची राष्ट्रीय युवा महोत्सवाला उपस्थिती…!
लाल दिवा-नाशिक,१४ :- नाशिक येथे सुरू असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी कालिदास कलामंदिरात नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी भुसे म्हणाले की युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान आहे. युवा महोत्सवाच्या निमित्ताने आज तरुणाईचा कुंभमेळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
नाशिक शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी नाशिक शहरात दाखल झाले आहेत. चार दिवस सुरू असलेल्या या युवा महोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. भुसे यांनी कालिदास कलामंदिर तसेच उदोजी मराठा हायस्कूल येथे भेट दिली. मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून सहभागी विद्यार्थ्यांचे अविष्कार यावेळी बघितले. यात महाराष्ट्राची लावणी तसेच पंजाब राज्याचे भांगडा नृत्याविषकार यावेळी बघितला.
उदाजी मराठा हायस्कूल येथे सुरू असलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन येथे भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते