नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून…चोख बंदोबस्त …सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर व मद्यपीं इसमांवर एकुण ३३६.केसेस.. १,लाख ९५, हजार २५० रुपये दंड वसूल….!

लाल दिवा-नाशिक,ता.१: ३१ डिसेंबर नववर्ष पूर्व संध्ये निमीत्त लावण्यात आला चोख बंदोबस्त सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर व मद्यपींवर करण्यात आली कारवाई

 

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हददीत ३१ डिसेंबर २०२३ रोजी नववर्ष पूर्व संध्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता चोख बंदोबस्त तैनात केला होता.

मा. पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना प्रत्येक पोलीस ठाण्यात फिक्स पॉईन्ट, नाकाबंदी व पेट्रोलिंग या प्रमाणे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे व मद्यपान करुन शांतता भंग करणारे इसम तसेच मद्यपान करुन वाहन चालविणारे इसम तसेच मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0xfyB6FcbAanM1EnaHBwETkqDx2EWZMh49QoAurE6syf37eYUxqkFb53pk4Lap6Hwl&id=100069362311166&mibextid=ZbWKwL

आयुक्तालयातील १३ पोलीस ठाणे हद्दीत ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट बंदोबस्त, ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईन्टचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ वाहने पेट्रोलिंग करीता अशी एकुण ६५ वाहने गस्ती करीता तैनात करण्यात आले होते.

https://twitter.com/nashikpolice/status/1741541099028570228?t=EYiCnaRNzIMgqN_GLl2mIQ&s=19

बंदोबस्त करीता तैनात करण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी नववर्ष पूर्व संध्येला उपद्रव करणा-या इसमांविरुध्द कारवाई केली. त्यामध्ये आडगांव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर असे परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात १५१ टवाळ खोर व ६३ रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अंबड, सातपुर, इंदिरानगर, उपनगर, नासिकरोड, देवळाली कॅम्प, एमआयडीसी चुचांळे असे परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १६३ टवाळखारे व ६८ रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा एकुण ४४५ इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 

मोटार वाहन कायदा कलमाचे उल्लंघन करणारे इसमांविरुध्द करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे.

 

तसेच मद्यपान करुन वाहन चालवुन मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणा-या २२ इसमांविरुध्द मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 

नववर्ष पुर्व संध्येच्या निमीत्ताने लावण्यात आलेल्या बंदोबस्तादरम्यान वरील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर बंदोबस्त मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे समवेत मा. श्री. प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. श्री. किरणकुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१, मा. श्रीमती. मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ असे ०३ पोलीस उप आयुक्त, ०६ सहा. पोलीस आयुक्त, ५९ पोलीस निरीक्षक, ९२ सहा. पोलीस निरीक्षक/पोउनि, ८८४ पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड यांनी सहभागी होवून शांततेत पार पाडला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!