खंडणी विरोधी पथकाची कामगिरी अंबड पोलीस ठाण्या कडील फरार आरोपी खंडणी विरोधी पथकाचे ताब्यात….!
लाल दिवा -नाशिक,२९ : अंबड पोलीस स्टेशन गुन्हा र.जी. नं११८/२०२१ भादवि ३२६,३२३, ५०४, ३४ मधील गुन्हयात सीआरपीसी २९९ प्रमाणे फरार आरोपी अशपाक रफिक पठाण वय २२ रा. बजरंग वाडी, विल्होळी नाका ता.जि. नाशिक हा मायको हॉस्पिटल दिंडोरी रोड पंचवटी नाशिक येथे असल्याची माहीती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अमलदार भगवान जाधव यांना गुप्तबातमी दारामार्फत बातमी मिळाली होती.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मायको दवाखाना पंचवटी या ठिकाणी सापळा लावुन सीआरपीसी २९९ प्रमाणे फरार आरोपी अशपाक रफीक पठाण वय २२ रा. बजरंगवाडी विल्होळी नाका ता. जि. नाशिक यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याची अटक पूर्व वैद्यकीय तपासणी करण्यात येवून त्यास पुढील तपास व कारवाईकामी अंबड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे, डॉ. सिताराम कोल्हे सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पो. निरी. विदयासागर श्रीमनवार, सपोनि प्रविण सूर्यवंशी, पोउनि दिलीप भोई, सपोउनि दिलीप सगळे, पोहवा किशोर रोकडे, पोहता राजेश भदाणे, पोना दत्तात्रेय चकोर पोअ भगवान जाधव यांनी केलेली आहे.