रक्ताने माखले सीबीएस! गट्टू हल्ल्यात अल्पवयीन संशयित ताब्यात..
लाल दिवा-नाशिक,दि.२:- नाशिकमधील सी.बी.एस. रोडवर एका व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हेशाखा युनिट १ ने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा हल्ला एवढा क्रूर होता की जखमीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने सिमेंटचा गट्टू (पेव्हर ब्लॉक) वापरून हा हल्ला केला होता.
घटना १ सप्टेंबर २०२४ रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
सध्या आरोपीला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1