आमदारांची खरेदी; म्हणुन नोकरी कंत्राटी..!कंत्राटी सरकारच्या कंत्राटी जी आरची राष्ट्रवादी युवक काॅग्रेस ने पेटविली होळी….!
लाल दिवा – नाशिक,ता.१८ : राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मूळात असंवैधानिक आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का?
असा संतप्त सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशावरून तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष नाशिक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार व राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे युवक प्रदेशकार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांंच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले
अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. कुणाचं तरी उखळ पाढरं करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे असा याचा अर्थ होतो.
एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. हि या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची एकप्रकारे फसवणूकच आहे.
महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे?
हे सर्व मुद्दे उपस्थित करीत शासनाच्या या निर्णयाचा जाहिर निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काॅग्रेस चे अंसख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन जी आर ची होळी देखील करण्यात येऊन जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले
- रद्द करा रद्द करा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा..!
- रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा.!भाजपा हटावा..!
- नोकऱ्या वाचवा आंदोलन..!
- कंत्राटी मुख्यमंत्री भरा पण नोकऱ्या परंमनंट करा.!
- कंत्राटी सरकार हाय..हाय..!
- रोजगार आमच्या हक्काचा.. नाही कोणाच्या बापाचा..!
- भाजपा हटावा..नोकऱ्या वाचवा..!
शासनाच्या विरोधात घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणानून सोडला होता
सदर आंदोलनाचे नेतृत्व युवक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ ,राष्ट्रवादी युवक काॅग्रेस प्रदेश सरचिटणिस शादाब सैय्यद, युवक प्रदेश उपाध्यक्ष बबलु शेलार, शहर सरचिटणिस मुन्ना अन्सारी यांनी केले
यावेळी युवक कार्याध्यक्ष किरण पानकर,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी शहर उपाध्यक्ष नितीन पिंगळे, पश्चिम विधानसभा कार्याअध्यक्ष निखिल भावसार, मध्य विधानसभा अध्यक्ष सागर बेदरकर, सिडको विभाग अध्यक्ष विक्रांत डहाळे, सातपूर विभाग अध्यक्ष अभिमन्यु गुडघे पाटील, नाशिकरोड विभाग अध्यक्ष समाधान कोठुळे, नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, मध्य विभाग अध्यक्ष सलीम शेख, शहर सरचिटणीस फहिम सैय्यद, गौरव सोनवणे, पंचवटी विभाग कार्यध्यक्ष संतोष जगताप, करण आरोटे, सुनील घुगे, किरण मानके, कृष्णा काळे, रितेश जाधव , गणेश गरगटे ,सनी अंडे, सागर अष्टेकर, संदीप क्षीरसागर, धंनजय साळवे , रोहित पाटिल , सुरज चव्हाण, विशाल काळे, अब्दुल शेख, मझर सैय्यद, संदीप निकम, कैलास काहंडळ, रुपेश काकड, राजू महाले, अतुल निमसे, प्रसाद पिंगळे, आशुतोष पिंगळे, जीवन लोखंडे, निखिल साळवे, आवेन ख़ान, अनिकेत निगळ, नरेन्द्र देशमुख , फारूक पठान, वैभव वारे, साहिल वाघ, हर्षल देसले, प्रविण बोराडे, रोहन घायवटे, आकाश सानप, तोफिक खान, भावेश वाकलकर, राजू पवार, समाधान भोसले, किरण दोंदे, गणेश भावले, अशोक पाळदे, मोईन खतिब, मूनव्वर शेख, परवेज अन्सारी, आंनद पाल, आकाश आहेर, सुमित चव्हान, निलेश शिरोळे, विनायक कांडेकर, प्रविण थेटे, राहुल रायकर, अनिल आहेर, कुमार गायधनी, अमित पवार, आकाश आहेर, सुमित चव्हाण, अमित महाले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
slot gacor
slot4d
situs slot
slot gacor hari ini
88slot
slot88
login slot88
daftar slot88
slot 88
slot4d
slot gacor hari ini
situs slot
88slot
slot88
login slot88
daftar slot88
slot 88