जहांगिर आर्ट गॅलरीत “Rhapsody 2023″चित्र प्रदर्शनाचे आयोजन डॉ.शेफाली भुजबळ यांच्या abstract चित्रांचा समावेश…!

लाल दिवा-नाशिक,मुंबई,ता.७:आर्टिव्हल फाऊंडेशनतर्फे ‘हाप्सोडी २०२३’या समूह प्रदर्शनाचे आयोजन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत ८ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ॲब्सट्रॅक्ट चित्रांचा समावेश असणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन तर्फे कॅन्सर पेशंटला मदत करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या चित्रांच्या विक्रीतून कॅन्सर पेशंटला मदत करण्यात येणार आहे.

 

या प्रदर्शनामध्ये वासुदेव कामत, प्रकाश घाडगे, प्रदीप सरकार, अजय डे, आशिफ होसेन, शशिकांत धोत्रे,गोपाळ परदेशी, बिरा किशोर पात्रा,दीपक बी. पाटील,विशाल फसले,जयदेव डोलुई,गोविंद शिरसाट, संतोष भोईर,डॉ. शंकर शर्मा, प्रतिभा गोयल,मरेडू रामू, सुदिप्ता अधिकारी,कश्यप रे,ज्योत्स्ना सोनवणे,डॉ. शेफाली भुजबळ, माया बी. रमनप्रीत कौर नारंग, शैलेश गुरव या २५ प्रतिष्ठित कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

 

या कलाप्रदर्शनात निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, ऐतिहासिक परंपरा, वारसा व संस्कृती विशेष दाखवणारी चित्रे, धार्मिक संकल्पनांवर आधारित पारंपारिक चित्रे,आधुनिक आणि अमूर्त जीवनातील वास्तव दर्शवणाऱ्या अनेक शिल्पाकृती ठेवण्यात येणार आहेत. चित्रे, तैलरंग, जलरंग, अॅक्रॅलिक, मिक्स मिडिया, चारकोल या माध्यमातील असून शिल्पकृती संगमरवरी दगड, मेटल, सिरॅमिक, कलाकृती, मिक्स मीडियामधील आहे. या प्रदर्शनात ६० कलाकृती एकाच छताखाली रसिकांना बघता येणार आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन शरद गुरव, सतीश पाटील यांनी केले आहे.

 

एम. इ. टी. भुजबळ नॉलेज सिटी च्या मार्गदर्शिका डॉ.शेफाली भुजबळ यांची ॲब्सट्रॅक्ट पेंटिंग या शैलीतील प्रसिद्ध पेंटिंग्स नेहमीच विविध प्रदर्शनात प्रसिद्ध झाली आहेत व त्यांना कलाप्रेमींचा खूप सुंदर प्रतिसादही मिळाला आहे. ‘ऱ्हाप्सोडी २०२३’ या समूह प्रदर्शनामध्ये डॉ.शेफाली भुजबळ यांच्या काही निवडक पेंटिंग्सचा सहभाग आहे. कला व चित्र प्रेमींनी या प्रदर्शनाचा निश्चितच लाभ घ्यावा असे आवाहन कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन व आर्टवल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!