“माजी नगरसेवकां”ना “नगरसेवक” पदाचा मोह सुटता सुटेना…!
लाल दिवा : “माणसाला एखाद्या गोष्टीचा मोह तरी किती असावा” याचे उद्दात्त उदाहरण माजी नगरसेवकांकडे बघून नागरिकांना बघायला मिळत आहे. मागील गेल्या दोन वर्षांपासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट आहे. त्यामुळे तेव्हापासून १२२ विद्यमान नगरसेवक हे “माजी नगरसेवका”च्या भूमिकेत दिसून येत आहे. परंतु हे नगरसेवक स्वतःला माञ माजी नगरसेवक म्हणायला काही करता तयार होत नाही. आजही त्यांच्या वाहनांवर, व्हिजिटिंग कार्डवर, दिशादर्शक फलकावर व घरावर नेम प्लेटवर नगरसेवक असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी सदर वाहनावरचे स्टिकर व जागोजागी लावलेल्या दिशादर्शक फलकावर स्वतःला माजी नगरसेवक म्हणण्याची तयारी दर्शविली पाहिजे. असे मत समस्त नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
नाशिक महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून
प्रशासनचा कारभार आयुक्त पाहात आहेत.
नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतरही
अनेक माजी नगरसेवकांच्या वाहनांवर “नाशिक
महानगरपालिका सदस्य” स्टिकर तशीच
कायम आहेत. पदाची मुदत संपल्यानंतर
शासकीय वाहने पालिकेकडे जमा करण्यात
आली. परंतु, स्वत:च्या खासगी वाहनांवर मात्र
“नाशिक महानगरपालिका सदस्य’ पदाचे स्टिकर
अद्यापही तशीच कायम आहेत. हे
नियमबाह्य असून आयुक्तांनी याबाबत
सूचना करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया
नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
“नाशिक महानगरपालिका सदस्य’
(नगरसेवक) म्हणून मिरविण्यापेक्षा
नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी
कामात सातत्य ठेवले तर नागरिकांच्या
मनात नगरसेवक म्हणून जागा कायम
राहील, ही बाब समजविण्यात संबंधित
नगरसेवकांसह त्या-त्या पक्षाचे प्रमुखही
कमी पडत आहेत. नगरसेवक पदाची मुदर
संपल्यानंतर वाहनांवरील “नाशिक
महानगरपालिका सभासदांचे स्टिकर काढणे
गरजेचे आहे. मात्र, संबंधित खात्यातील
वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत
आहेत.
तसेच अब क ड यांच्या निवासस्थानाकडे…
अनेक नगरसेवक तसेच माजी
नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील
रस्त्यांवर स्वत:च्या निवासस्थानाकडे
जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक
लावले आहेत. अनेक प्रभागात “माजी
नगरसेवक’ तर करीत कधी “नगरसेवक अ
ब क ड यांच्या निवासस्थानाकडे’ असा
उल्लेख या फलकांवर आढळतो, अशा
फलकांची प्रभागात खरोखच गरज आहे
का? प्रभागातील नागरिकांना त्या-त्या
नगरसेवकाचे निवासस्थान माहित नसते
का ? हा अनावश्यक खर्च कशासाठी? असे फलकही काढण्यात यावेत, अशी
नागरिकांची मागणी आहे.
एकीकडे वाहनांवर पत्रकार व पोलीस आदी प्रकारचे नावे लिहू नये असा नियम आहे. असा नियम नगरसेवकांना लागू होत नाही का ? जर ते नगरसेवकच नाही तर मग नगरसेवक म्हणवून घेणे कितपत योग्य आहे. अशा प्रकारचा सवाल सर्वसामान्य नागरिक या निमित्ताने व्यक्त करताना दिसत आहे.