दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणा-या इसमास केले हत्यारासह जेरबंद …!
लाल दिवा, ता. ७ : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने
प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री वसंत मोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना दिनांक ०६/०५/२०२३ रोजी आडगांव पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे पद्माकर राजेंद्र विसपुते याचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस असल्याची गोपनिय माहीती मिळाली होती. सदरच्या माहीतीवरून दरोडा व शस्त्र विरोधी पथक नाशिक शहर यांनी आरोपी राजेंद्र पद्माकर विसपुत वय ३९ वर्षे, रा. नांदुर नाका, तुळजाभवानी मंदीराच्या मागे, आडगांव, नाशिक हा त्याचेजवळ गावठी देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनह, ०१ जिवंत काडतूस व ऑटो रिक्षा क्र. एम. एच. १५ एफ. यु. ६०९९ सह जवळ बाळगतांना मिळुन आल्याने व त्याने मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेश भंग केल्याने त्यांचे विरुध्द आडगांव पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कलम ३/२५ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधीपथक मधील सपोनि / किरण रोंदळे व पोलीस अंमलदार १) पोहवा / विजयकुमार सुर्यवंशी २ ) पोअं / महेश खंडबहाले ३) पोअं. / संदीप डावरे ४) पोअं / विशाल जोशी ५) पोअं / प्रविण चव्हाण ६) मपो अं/ मनिषा कांबळे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.