कट मारत कुरापत काढुन कारसह पळवून नेत जबरी चोरी करणा-या ०३ आरोपींना रोख रक्कम व मुदमालासह केले जेरबंद … गुन्हे शाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी.
लाल दिवा, ता. ७ : दिनांक ०६/०५/२०२३ रोजी ०२.०० वा. चे सुमारास फिर्यादी हर्षल सुभाष पारोळकर हे त्यांची कार नंबर एम. एच. १५ एफ टी. ७१७६ हीचेमध्ये इंदीरानगर बोगदा येथुन जॉगींग ट्रकचे बाजुने संत सावतामाळी साईनाथ चौफुलीजवळुन जात असताना एक रिक्षा चालकाने कारला कट मारला, त्यांनी कारचा वेग कमी केला असता रिक्षाचालक कारजवळ आला त्यांनीच आमचे रिक्षास कट का मारला या कारणावरून रिक्षामधील ४ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने फिर्यादी यांना त्यांचेच कारमध्ये पाठीमागे बसवुन कार वेगवेगळया ठिकाणी नेवुन फिर्यादी यांचा बळजबरीने खिशातील ४,०००/-रू रोख, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, मनगटी घडयाळ, मोत्याची अंगठी, एटीएम कार्ड, आधार पॅन इ. वस्तु काटुन घेतल्या, त्यानंतर फिनाचे कारमध्ये विल्होळी जैनमंदीराकडे पळवुन नेवुन फित्रा यांचे गुगल पे वरून जबरीने रक्कम ट्रान्सफर केली होती, त्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणेस गु.र.नं. १५९/२०२३, भा.द.वि. कलम ३९४, ३६४- ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा प्रकार अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने सदरचा गुन्हा करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत मा. पोलीस आयुक्त सो. श्री. अंकुश शिंदे सो., मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. प्रशांत बच्छाव सो., मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा श्री. वसंत मोरे अशांनी गुन्हेशाखा युनिट क. १, २ व मध्यवर्ती गुन्हेशाखा अशांना सक्त सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वपोनिरी. श्री. विजय ढमाळ व गुन्हेशाखा युनिट क्र. १ कडील पथकातील सपोनि / हेमंत तोडकर, पोलीस सपोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा / १०९ प्रविण वाघमारे, पो. कॉ. १९०० विशाल देवरे, पो. कॉ. २५४४ मुक्तार शेख, पो.कॉ / १४०५ आप्पा पानवळ यांनी गुन्हा दाखल होताच, तात्काळ समांतर तपास करून सदर आरोपी हे विल्होळी या दिशेकडे गेल्याची माहीती मिळाली होती, सदर परीसरातील सी. सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता, एका पेट्रोलपंपावर आरोपींचे सी. सी. टी. व्ही. फुटेज मिळुन आले, सदर सी.सी.टी.व्ही फुटेजवरून गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींचा शोध घेत असता पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना आरोपींबाबत माहीती मिळाली, त्यावरून आरोपी नामे १) युनुस उर्फ अण्णा अयुब शहा वय २४ वर्षे रा. बिल्डींग नं. अ-७, चवथा मजला म्हाडा कॉलनी, वडाळागांव नाशिक २) वसीम बशीर सैय्यद वय- ४१वर्षे रा. घर नं. १५/२, संजेरी मार्ग, वडाळा गांव नाशिक ३) गुलाम सादीक मोढ़ें वय २७ वर्षे रा. माळी गल्ली, वज्रेश्वरी मंदीराजवळ, वडाळागाव नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून सखोल विचारपुस केली असता, गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली. त्यांनी सदरचा
नमुद आरोपी इसमांकडुन जबरी चोरी केलेले फिर्यादीचे एक टायटन कंपनीचे घडयाळ, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, एक पांढ-या धातुची अंगठी व रोख रक्कम ४,५००/- रू तसेच गुन्हयात वापरलेली अॅटो रिक्षा क्रमांक एम.एच १५ झेड ९८४७ असा एकुण ९६,५००/- रु. किंमतीचा मुददेमाल पंचनामा करून हस्तगत करण्यात येवुन मिळुन आलेल्या इसमांना गुन्हयाचे पुढील तपास व कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास मुंबई | नाका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो. मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. प्रशांत बच्छाव साो. मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत मोरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांनी केली आहे.