गंगापुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ४८ तासांत खूनातील ६ आरोपी गजाआड
शहर सुरक्षित हातात ,पोलिसांचे कौशल्य उजळले
लाल दिवा-नाशिक,दि ११ मार्च २०२५: शहरात धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांना गंगापुर पोलिसांनी जोरदार धक्का दिला आहे. एका निर्घृण खुनाच्या घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने शहरवासियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दिनांक ८ मार्च रोजी रात्री संतकबीरनगर परिसरात अरुण रामलु बंडी (१७) या तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. समीर सैय्यद, विलास थाटे, जावेद, करण चौरे, ओम खंडागळे आणि त्यांच्या साथीदारांनी कोयता, बेसबॉलचा दांडा, रॉड, लोखंडी शिकंजा आणि दगडांनी अरुणवर हल्ला केला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
गंगापुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. गुन्हेशोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पाच आरोपींना गजाआड केले. तर गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ ने एका आरोपीला विंचूर येथून ताब्यात घेतले. या कारवाईत समीर मुनीर सैय्यद, जावेद सलीम सैय्यद, विलास संतोष थाटे आणि करण उमेश चौरे यांना अटक करण्यात आली असून दोन बालअपराधींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास