पत्रकारांचा आवाज बुलंद करणारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’: अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वाला पुन्हा संधी !
व्हॉईस ऑफ मीडिया’ निवडणुकीत म्हस्के यांचा दणदणीत विजय
- लाल दिवा -निवासी संपादक भगवान थोरात
लाल दिवा-नाशिक,दि.२४:- – जागतिक पातळीवर ४३ देशांत कार्यरत असलेल्या आणि ३ लाख ९० हजारांहून अधिक पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत बुलढाण्याचे अनिल म्हस्के हे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. जळगावचे दिगंबर महाले हे संघटनेचे सरचिटणीस म्हणून निवडले गेले आहेत.
राज्यातील प्रमुख तीनशे पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. यामध्ये ९२ टक्के एवढे प्रचंड मतदान झाले. गेल्या तीन वर्षांपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिल म्हस्के यांना प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली.
- नव्या कार्यकारिणीची रूपरेषा
- प्रदेशाध्यक्ष : अनिल म्हस्के
- सरचिटणीस : दिगंबर महाले
- कार्याध्यक्ष : योगेंद्र दोरकर (नंदुरबार), विजय चोरडिया (परभणी), मंगेश खाटीक (चंद्रपूर)
- उपाध्यक्ष :अजित कुंकुलोळ (सोलापूर), संजय पडोळे
- *कोकण आणि मुंबई विभागीय अध्यक्ष :अरुण ठोंबरे
- उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष :मिलिंद टोके
- विदर्भ अध्यक्ष : किशोर कारंजेकर
- मराठवाडा अध्यक्ष :सतीश रेंगे पाटील
- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष :सचिन मोहिते
- राज्य कार्यवाह : अमर चोंदे
उर्वरित आठ जणांची राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष लवकरच करतील, असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रेस क्लब येथे सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना अनिल म्हस्के म्हणाले, “मी गेली तीन वर्षे पत्रकारांसाठी मेहनत करत होतो आणि ही मेहनत या निवडीमुळे सार्थकी झाली आहे. पुन्हा एकदा मला संपूर्ण राज्यातील पत्रकारांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.”
निवडणुकीनंतर तात्काळ प्रभावी होत जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर पासून जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.