धर्मध्वजाचा गौरव! महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!

शपथविधी सोहळ्यात अनिकेतशास्त्रींची उपस्थिती दर्शविणार धर्म-राजकारणाचा संगम

लाल दिवा-नाशिक,दि.४:- (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकीय पटलावर एक नवा सूर्य उगवत असताना, धर्माच्या प्रकाशानेही त्याचे तेेज वाढवले जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिकच्या पवित्र भूमीवरून धर्मध्वजाचे वाहक, श्रद्धेचे प्रतीक, ज्ञानाचे सागर असे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांना आमंत्रण मिळाले आहे. ही बाब नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर रंगणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्यात, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांची उपस्थिती म्हणजे धर्माची आणि राजकारणाची एक अद्भुत सांगड असणार आहे. राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर व नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. पण महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारशास्त्री भोसले यांनी दिल्यानुसार, वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचे जतन करणार्‍या या सरकारमध्ये धर्माचार्यांना विशेष स्थान आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहप्रदेशाध्यक्ष ह.भ.प. संजय धोंडगे यांनी या निमंत्रणाबद्दल आनंद व्यक्त करून म्हटले आहे की, “देश, धर्म आणि संतांचा सन्मान करणाऱ्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण मिळणे हे माझे भाग्य समजतो.”

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. त्यांची उपस्थिती या सोहळ्याला आणखी दिव्यता प्रदान करेल, यात शंका नाही. त्यांच्या आशीर्वादाने नवीन सरकारला राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बल मिळेल, अशी अपेक्षा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!