कोष्टी गोळीबार प्रकरणातील फरार झालेले ७ आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी

लाल दिवा, ता. २१ : अंबड पोलीस ठाणे हददीत दि. १६/०४/२०२३ रोजी राकेश कोष्टी याचे वर अनोळखी इसमांनी गोळीबार करून, दहशत माजवुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत अंबड पोलीस ठाणे भादवि कलम ३०७, १०९, ११४, १२० ब, सह आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ कडुन गुन्हयाचा समांतर तपास चालु होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सदर गुन्हयातील आरोपी मध्यप्रदेश येथे असल्याची बातमी मिळाले

वरून सपोउनि रविंद्र काशिनाथ बागुल, पो. हवा. प्रविण अशोक वाघमारे, प्रदिप चंद्रकांत म्हसदे, नाझीमखान पठाण, पो. ना विशाल भास्कर देवरे, प्रशांत रामदास मरकड, अशांचे पथक तयार करून ते वरिष्ठांच्या परवानगीने मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आले होते.

सदर पथकाने सतत तीन दिवस अहोरात्र मेहनत घेवुन तपासाचे कौशल्य वापरून सदर आरोपींचा मागोवा घेत शोध घेत असतांना सदर आरोपी मध्यप्रदेशातील इंदोर मार्गे ओंकारेश्वर जवळील बडवाह, जि. खरगोन या ठिकाणी असल्याची माहीती मिळवली सदर ठिकाणी सतत १८ तास सापळा लावुन अतिशय शिताफीने गुन्हयातील मुख्यसुत्रधार आरोपी किरण दत्तु आण्णा शेळके रा. पंचवटी नाशिक तसेच सचिन पोपट लेवे रा. पंचवटी, नाशिक, किशोर बाबुराव वाकोडे रा. कथडा, जुने नाशिक, राहुल अजयकुमार गुप्ता रा. पंचवटी नाशिक, अविनाश गुलाब रणदिवे रा. सातपुर, नाशिक, श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे रा. जुना आडगाव नाका, पंचवटी नाशिक, जनार्दन खंडु बोडके रा. पंचवटी नाशिक यांचा शोध घेवुन त्यांना कोठुआ आश्रम, ता. बडवाह जि. खरगोन, राज्य मध्यप्रदेश येथे ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीतांचे ताब्यातुन ४,००,०००/- रूपये किंमतीची स्कोडा कंपनीची, मॉडेल ऑक्टीव्हीया, कार क. एम एच ४३ व्ही ४९६९, तसेच कार मध्ये डॅशबोर्डचे खालील डिक्की मध्ये १,०००/- एक स्टिलचा चॉपर आणि १,०००/- एक स्टिलचा बटनी चाकु, असा एकुण ४,०२,०००/- रूपये किंमतीच्या मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांना पुढील तपास व कारवाई कामी अंबड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे , यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वपोनि. विजय ढमाळ, सपोउनि रविंद्र काशिनाथ बागुल, पो. हवा. प्रविण अशोक वाघमारे, प्रदिप चंद्रकांत म्हसदे, नाझीमखान पठाण, संदिप जयराम भांड, शरद सोनवणे पो.ना. विशाल भास्कर देवरे, प्रशांत रामदास मरकड, महेश वसंत साळुखे यांनी केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!