” नाशिक शहरातील प्रायव्हसी पुरविणाऱ्या ०९ कॉफी शॉपवर पोलीस व महानगरपालीकेची धडक कारवाई”..!

लाल दिवा -नाशिक,दि.१८ : शहरातील कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट / पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवुण सदर ठिकाणी अंमली पदार्थांचे – सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याअनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केली असता ०९ कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचे निदर्शनास आले. सदर अंतर्गत रचनेमुळे अंमली पदार्थ सेवण तसेच महिलांविरोधी गुन्हे घडण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती.

  • सदर कॅफे शॉपवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे महानगरपालिकेस विनंती करण्यात आली होती. यानुसार कारवाईसाठी पोलीस विभाग व महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट / पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण ०९ कॉफी शॉप मधील अनाधिकृत बांधकाम निष्काशित करण्यात आले. तसेच सदरच्या आस्थापणा महानगरपालिकेकडुन सिल करण्यात आलेल्या आहेत
  • सदरची कारवाई करण्यात आलेल्या आस्थापणा पुढील प्रमाणे.
  • १) सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, कॉलेजरोड, नाशिक २) यारी कट्टा, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ३) कॅफे क्लासिक डे लाईट, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ४) हॅरीज किचन कॅफे, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक ५) लकिज कॅफे, थत्ते नगर, गंगापुर रोड, नाशिक ६) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ७) वालाज कॅफे टेरीया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ८) मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, महात्मा नगर, नाशिक ९) मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डि. के. नगर, नाशिक.

सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर व मा. श्री. डॉ. अशोक करंजकर, आयुक्त तथा प्रशासक, म. न. पा. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १, नाशिक शहर, श्री. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, श्री. श्रीकांत निंबाळकर, व. पो. नि. गंगापुर पोलीस ठाणे, श्री. दिलीप ठाकुर व पो. नि. सरकारवाडा पोलीस ठाणे व पथक तसेच श्री. श्रीकांत पवार, उपायुक्त, म. न. पा. नाशिक, श्री. संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता, श्री. हर्षल बाविस्कर, उप संचालक, टाउन प्लॅनींग, श्री. हरिष चंद्रे, श्री. राजाराम जाधव, श्री. योगेश रकटे, विभागीय अधिकारी, म. न. पा. नाशिक व पथक यांनी केलेली असुन नाशिक शहरात यापुढे अशाच प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!