मोटार सायकल चोरी करणाऱ्या २ आरोपीसह १७ मोटर सायकल जप्त ; एकूण १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत…गुन्हेशाखा युनिट २ चे गुलाब सोनार यांची नूतन वर्षात धडाकेबाज कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.११:- मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. श्री. प्रंशात बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक, मा. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आनन्याकरीता सुचना व मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे दिनांक ११/०१/२०२४ रोजी पोहवा/गुलाब सोनार, गुन्हेशाखा, युनिट-२, नाशिक शहर यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्चये पोलीस निरीक्षक श्री. रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली इसम नामे १. विशाल मधुकर धांडे वय ३८ वर्ष, रा. केवलपार्क, महादेव मंदीराजवळ, अंबड, नाशिक २. माहेन शालीग्राम ढाके वय ३७ वर्ष, रा. स्वामीनगर, ओमकारेश्वर महादेव मंदीराजवळ, अंबड, नाशिक यांना पोउपनि/संदेश पाडवी व त्यांचे सोबतचे पथकाने अंबड पोलीस ठाणेकडील गुरन ७७०/२३ भादविक ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरलेली बुलेट मोटार सायकल विक्री करण्याकरीता आले असताना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे अधिक सखोल व कौशल्यपुर्ण तपास करता त्यांनी नाशिक शहर परिसरातुन बुलेट, अॅव्हेंजर, शाईन, पल्सर, मोपेड मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून चोरलेल्या मोटार सायकल दिल्या असल्याने त्यांचे कडून एकुण १३,३५,०००/- रू किंच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळून आलेल्या मोटार सायकल बाबत खालील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/संदेश पाडवी, सपोउपनि यशंवत बेडकोळी, बाळु शेळके, पोहवा / गुलाब सोनार, प्रशांत वालझाडे, शंकळ काळे, चंद्रकात गवळी, विजय वरंदळ, सुनिल आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, राजेंद्र घुमरे, मधुकर साबळे, अतुल पाटील पोना/नितिन फुलमाळी, पोअ/प्रविण वानखेडे यांनी केलेली आहे.