नाशिककरांची मन की बात, मा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी करावी :- अनिता भामरे भाजप शहर उपाध्यक्ष नाशिक…!
लाल दिवा-नाशिक,ता.१२:-२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक मध्ये घरोघरी सभेला उपस्थित रहा व मोदींचे विचार ऐका असे सांगत असतांना मात्र नाशिकच्या जनतेने पंतप्रधान मोदींनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी करावी अशी मन की बात बोलून दाखवली अशी माहिती सौ अनिता भामरे शहर उपाध्यक्ष भाजप यांनी व्यक्त केली आहे.
युवकांनो उठा, जागे व्हा अन् ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका असा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय युवा दिन साजरा होत असतांना २७ व्या राष्ट्रीय युवा दिनाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान मोदी आज नाशिक मध्ये येत आहेत. मा पंतप्रधान मोदींनी आपल्या १० वर्षाच्या पंतप्रधान काळात देश सर्वोच्च स्थानावर नेऊन पोहचवला आहे. सामान्य जनतेला लाभ देणाऱ्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळेच मोदी म्हणजे विकासाची गॅरंटी हे सिध्द होतांना दिसते.
गेल्या ५२७ वर्षांपासून रामलल्लाचे मंदिरास आठकाठी येत होती. मात्र पंतप्रधान मोदींनी ते ही स्वप्न प्रत्यक्षात उतरवत देशातील जनतेला दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा घडवण्याचे भाग्य याची देह याची डोळा पाहण्याचा दिवस आणून ठेवला. प्रभु श्रीराम जेव्हा १४ वर्ष वनवासाला निघाले त्या वेळी श्रीरामाचे वास्तव्य काही काळ तपोवन नाशिक भूमित होते. अशा पुण्यनगरी नाशिकचे आणि श्रीरामाचे अतूट नाते आहे. पंतप्रधान मोदींची कल्पकता, धडाडी या गोष्टींतून मोदींनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी केली तर नाशिक चे भाग्य नक्कीच उजळेल अशी भावना नाशिककरांनी मन की बात सांगून बोलून दाखवली.
सध्या नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ त्यात तीन भाजप कडे, दोन अजित पवार गटाकडे असून गेल्या नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता (६६ नगरसेवक) होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी लोकसभेतून उमेदवारी केल्यास बिनविरोध तर निवडून येतीलच आणि नाशिक देशाच्या पटलावर धार्मिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारूपास येईल यात शंका नाही. आता सर्वस्वी निर्णय मोदी साहेबांनी घ्यायचा नाशिकची जनता त्यांच्या पाठिशी उभी राहील अशी भावना एक भाजपची महिला कार्यकर्ती म्हणून अनिता भामरे यांनी व्यक्त केली आहे.