“वरखेडा मंडळात महसूल पंधरवडा २०२४” अंतर्गत युवा संवाद व युवा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न….!
वरखेडा मंडळ व सह्याद्री फार्म- टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र मोहाडी,
लाल दिवा-नाशिक,ता.९ :- वरखेडा मंडळ व सह्याद्री फार्म- टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र मोहाडी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, खेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय येथे युवा प्रशिक्षण व युवासंवाद कार्यक्रम दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री फार्म्स – टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्राचे श्री. सचिन सोनवणे सर आणि श्री. देवेंद्र निंबोळकर सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकेश कांबळे, तहसीलदार दिंडोरी हे असून, प्रीती अग्रवाल मंडळ अधिकारी वरखेडा तसेच श्री. साकीब शेख तलाठी खेडगाव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कारे सर यांनी केले. युवा संवाद, व प्रशिक्षणास शिक्षक वर्ग, व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा संवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच सह्याद्री फार्म्स- टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्रा मार्फत राबविण्यात येणारे विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम याविषयीं माहिती देऊन, सदर उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम हे पूर्णपणे मोफत उपलब्ध असून, त्याद्वारे युवकांना रोजगार आणि व्यवसाय यांच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.