पोलीस व पत्रकारांच्या कार्याचा समन्वय आवश्यक- उपायुक्त मोनिका राऊत….! पत्रकारांची नेत्र तपासणी करून पत्रकार दिन साजरा, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा उपक्रम…!

लाल दिवा-नाशिक,ता.७ : पोलीस व पत्रकारांनी समन्वयाने कार्य केल्यास गुन्हेगारीला पायबंद घालण्यास मदत होईल असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघा तर्फे आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दै. भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेशपंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे यांनी प्रास्ताविकात नाशिक तालुका पत्रकार संघा चे कार्यविशद केले. याप्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सर्व पत्रकार संघटनांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवल्यास शासन दरबारी प्रलंबित पत्रकारांच्या अनेक मागण्या पूर्ण करून घेता येतील असे प्रतिपादन दै. भ्रमर चे संपादक चंदुलाल शहा यांनी केले.

 

यानंतर पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे ५० पत्रकारांनी लाभ घेतला. यावेळी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते वार्षिक प्रेस कार्डचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक हॉल, द्वारका येथे संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ .सुनिता पाटील, पंकज पाटील , डॉ. राकेश श्रिवांश, प्रवीण गोतीसे, भैय्यासाहेब कटारे, जनार्दन गायकवाड, विश्वास लचके, अब्दुल कादिर पठाण, तौसीफ शेख, दिनेश पगारे, तेजश्री उखाडे या पदाधिकाऱ्यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणसिंग बावरी यांनी केले तर आभार लियाकत पठाण यांनी मानले.

….

 

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात उपस्थित पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, दै. भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण समवेत पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!