मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री….आम्हाला झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांना पोलिसांनी अडवायचे नाही….. ते त्यांचं काम करत असतात …. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे……त्यामुळे त्यांची अडवणूक पोलिस करू शकत नाहीत……पत्रकारांशी बोलायचं की नाही ते आम्ही नेते ठरवू. ….यापुढं पत्रकारांची तक्रार येता कामा नये : उपमुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सज्जड दम…..!
लाल दिवा-नाशिक,ता. :-पोलिस बंदोबस्तामुळे पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू दिले जात नाही, अशी तक्रार पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अजित पवार यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून घेतले आणि पोलिसांनी पत्रकारांना रोखू नये याबाबतच्या सुचना दिल्या.
पत्रकारांनी पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या, तरी ही आज पुन्हा पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली होती. मग अजित पवार यांनी थेट विनय कुमार चौबे यांना बोलावून घेत सुचना केल्या.
अजित पवार यांनी चौबे यांना बोलवले, यापुढे पत्रकारांना पोलिसांनी रोखू नये. महायुतीचे मंत्री पत्रकारांशी बोलायचे का नाही हे ठरवतील, पण पोलिसांनी पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखू नये. असे अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले.
अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिंदे असो, उपमुख्यमंत्री फडणवीस असो की मी. आम्हाला झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांना पोलिसांनी अडवायचे नाही. ते त्यांचं काम करत असतात, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळे त्यांची अडवणूक पोलिस करू शकत नाहीत.
पत्रकारांशी बोलायचं की नाही ते आम्ही नेते ठरवू. यापुढं पत्रकारांची तक्रार येता कामा नये.’