युनिट १ चे पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांची जबरदस्त कामगीरी…….खुन करून फरार झालेले दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करत खुनाचा गुन्हा आणला उघडकीस……!
लाल दिवा : नाशिकरोड पोलीस ठाणे कडील दि,(१८) फेब्रुवारी २०२४ रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णीक सो. यांनी सुचना दिल्या होत्या, तसेच पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्छाव व . सहायक पोलीस आयुक्त ड सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट कमांक १ यांना मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हयातील अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे गरजेचे होते. त्याअनुषगाने गुन्हेशाखा युनिट कमांक १ यांनी सदर मयताची ओळख पटवुन त्याचे नाव चेतन आनंदा ठमके, रा-सावरकर नगर अंबड, नाशिक हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना अज्ञात आरोपीचे नाव व पत्ता तात्काळ निष्पन्न केले.
गुन्हेशाखा युनिट क १ कडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख व पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहिजे आरोपी पंकज आहेर व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढ-या रंगाच्या एक्टीव्हा मोटार सायकलवर सातपुर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करुन संशयीत इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांचे पथक पाठविले असता, नमुद पथकाने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे सातपुर परिसरात सापळा लावुन एक्टीव्हा गाडी व त्यावरील इसम नामे १) पंकज विनोद आहेर, वय-२५वर्षे, रा-महाकाली चौक, सिडको नाशिक, २) आशिष रामचंद्र भारद्वाज, वय-२५वर्षे, , रा-शुभमपार्क उत्तमनगर, सिडको नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांना वरील गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचे साथीदार अशांनी मिळून चेतन आनंदा ठमके यास लोखंडी कोय-याने मारहाण करून जखमी करून त्यास जिवे ठार मारले आहे बाबत कबुली दिल्यावरून नाशिकरोड पोलीस स्टेशन गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी यांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेली एक्टीव्हा गाडी व गुन्हयातील लोखंडी कोयता असा एकुण ५०, ५००/-रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलीस ठाणे यांचेकडे हजर करण्यात आले आहे. गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध गुन्हेशाखा युनिट क १ हे घेत आहे…