वरखेडा मंडळात महसूल पंधरवडा 2024 – महाराजस्व अभियान अंतर्गत अतिक्रमित शिवरस्ते ची पाहणी करण्यात आली….!
वरखेडा मंडळात महसूल पंधरवडा 2024 महाराजस्व अभियान अंतर्गत शिवरस्ते मोकळे करणे
लाल दिवा-नाशिक,ता.९ :- वरखेडा मंडळात महसूल पंधरवडा 2024 महाराजस्व अभियान अंतर्गत शिवरस्ते मोकळे करणे साठी जऊळके वणी ते धामणवाडी शिवरस्ता ची पाहणी करणेत आली.
सदर रस्ता मध्ये ११ शेतकरी यांचे अतिक्रमण दिसून आले. जवूळके वणी गावाचे सरपंच योगेश दवंगे, ग्रामविकास अधिकारी एस.पी. नवले, मंडळ अधिकारी वरखेडा प्रीती अग्रवाल, तलाठी धामणवाडी साकीब शेख , तलाठी जवूळके वणी बी. आर. कांडेकर व ज्येष्ठ नागरीक, ग्रामस्थ यांचे उपस्थितीत शेतकरी खातेदार यांचे सोबत चर्चा करून रस्ता मोकळा करून देणे बाबत समुपदेशन करणेत आले. ०९ शेतकरी रस्ता देनेस तयार असून ०२ शेतकरी यांचे मोजणी झाले नंतर आम्ही रस्ता देऊ असे मत व्यक्त केले . ग्रामपंचायत जवूळके वणी व लोक सहभागातून मोजणी करून सदर रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देणे बाबत नियोजन करण्यात आले.