मुंबईनाका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाडुन……डी मार्ट येथे चोरी करणा-या इसमास….. पकडण्यात यश…!
लाल दिवा..मुंबईनाका पोलीस ठाणे। दि,(८) दुपारी ३ वा चे सुमारास, फिर्यादी नामे सौ. मृणाल शैलेश काळे वय ४७ वर्षे, व्यव डॉक्टर रा. फलॅट नं ०७, चौथा मजला, लक्ष्मी विरल हाईटस , अशोका टॉवर समोर, अशोकामार्ग, नाशिक हया डी मार्ट शॉपींग मॉल, साईनाथनगर, नाशिक येथे घरगुती सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी त्यांचेकडे असलेली लोखंडी ट्रॉलीमध्ये ठेवलेली त्यांची बॅग (पर्स) मधील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकुण १, लाख २२, हजार रू किं.चा ऐवज कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी याचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेली म्हणुन त्याबाबत मुंबईनाका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईनाका पो. स्टे कडिल गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार टेमगर, सागर जाधव, राजेंद्र नाकोडे अमोल बागलाने, कविता महाले यांनी सदर घटनेचे गार्भिर्य लक्षात घेवुन सदर घटनास्थळाला भेट देवुन लागलीच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सदर इसमाचे वर्णन मिळवुन तसेच त्याने फोन पे दवारे केलेल्या पेमेंटच्या आधारे सदर इसमाचा मोबाइल नंबर हस्तगत करून त्या मो नंबरच्या आधारे तांत्रीक विश्लेषण विभागाची मदत घेवुन काही तासांच्या आत शोध घेवुन आरोपी नामे प्रदीप रामचंद्र बर्वे वय ३८ वर्षे रा फलॅट नं ०८, पंचधारा अपार्ट, दत्तमंदीर रोड, नाशिकरोड
, नाशिक यास संपुर्ण मुददेमालासह ताब्यात घेतले असुन गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक साहेब, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ श्री. किरणकुमार चव्हान सहा. पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरूटे, सपोनि सुधीर पाटील, सोबत गुन्हे शोध पथकाचे पोउनि एन एस. शेख, पोहवा आर. आर टेमगर, जाधव, नाकोडे, बागलाने, महाले यांनी कारवाई केलेली आहे. तसेच सदर गुन्हयाचा
पुढील तपास म्हैसधुणे हे करीत आहेत.