डॅशिंग लेडी ! पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली…….. परिमंडळ-२ मधील फिर्यादी यांना गुन्हयातील रु.६०,८९,८३७ चा मुद्देमाल परत ….!
लाल दिवा : परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका नं. राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत नेमणूक केलेल्या ” मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी ” यांना मा. पोलीस आयुक्तांची नागरिकस्नेही भुमिका समजावून सांगून त्याप्रमाणे फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल सन्मानाने परत करणेसाठी अधिनस्त विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निर्देशित केले होते.
पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका नं. राऊत यांचे संकल्पने नुसार आज दि. ३१/०१/२०२४ रोजी परिमंडळ-२ मधील फिर्यादी यांना २६ मोटारसायकली किंमत रु. २२,२२,०००/-, ०२ चारचाकी वाहने किंमत रु.२५,००,०००/-, ०१ रिक्षा किंमत रु.५०,०००/-, ०२ सायकली किंमत रु. १५,०००/-, ०६ मोबाईल – किंमत रु. ८८,०००/-, सोन्याचांदीचे दागिने किंमत रु. ०४,०५,५००/-, इतर माल रू. ७, ९९,२३७/-, रोख रक्कम रु. १०,१००/- एकुण रु.६०,८९,८३७/- चा मुद्देमाल सन्मानाने परत करण्यांत आला आहे.
सदर उपक्रम पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका नं. राऊत यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुद्दमाल विल्हेवाट अधिकारी, मुद्देमाल कारकुन यांनी उत्कृष्ठपणे पार पाडलेला आहे.
चोरीस गेलेला तसेच लुट झालेला मुद्देमाल परत मिळाल्या बद्दल नागरिकांनी पोलीसांचे आभार मानून सदर उपक्रमाचे कौतुक केले आहे. यापुढेही मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त मुद्देमाल दरमहा फिर्यादी यांना परत करण्यांत येणार असल्याचे पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगितले.