गुंडाविरोधी पथकाची जबरदस्त कामगिरी…….उपनगर येथील गंभीर गुन्हयातील फरार बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह इतर तीन आरोपीस दिल्ली येथून अटक…..!
लाल दिवा-नाशिक,ता.२३ : (दि’१६) गुरुवारी २०२४ रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर यांनी फिर्यादी यांना पकडुन मागील भांडणाची कुरापत काढुन मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करु लागल्याने फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले म्हणुन फिर्यादी मयुर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस स्टेशन कडे । गुरनं ५६/२०२४ भादंविक ३०७, १४३,१४७,१४८,१४९,३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने गुन्हा दाखल झाले पासुन सर्व आरोपी फरार होते.
सदर गुन्हयातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुन्हयातील सर्व आरोपीतांचा तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन आरोपीतांबाबत माहिती काढली की, आरोपी नामे विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवुन राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे पळुन गेले आहे. त्यानुसार सदरची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवतन असे (दि,२०) फेब्रुवारी २०२४ रोजी राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे रवाना झाले होते. आरोपीतांचा शोध घेत असतांना ( दि,२२) फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपी हे राजस्थान, हरियाणा येथुन दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनचे बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसुन आल्याने संशयीत आरोपी नामे १) विजय उर्फ छंगा सरजीत बहेनवाल २) राहुल अजय उज्जैनवाल ३) प्रदिप उर्फ गणेश विठ्ठल काळे ४) गणेश उर्फ गौरव सुनिल सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधुन पळून जावु नये म्हणुन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी योग्य ते नियोजन करुन सापळा रचुन शिताफीने आरोपीतांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीतांना दिल्ली येथुन नाशिक येथे आणुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी संदीप कर्णीक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सिताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.