नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या पोउपनि सुनिल बिडकर यांची जबरदस्त कारवाई…

गाईचे मांस विक्री साठी घेवुन जाण-या दोन आरोपीसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त…….. गो रक्षकांनी मानले आभार….!

लाल दिवा-नाशिक,ता.२५ :-   महाराष्ट्र राज्यात गोवंश जातीचे प्राण्याचे मांस विक्री, कत्तल, साठा, व वाहतुक करणारे इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

त्याअनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाणे कडील पोउपनि सुनिल बिडकर, पोलीस शिपाई शिंदे, कु-हे, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार गोसावी सोबतचे पथक यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे हददीत शोध सुरू केला होता.( दि.२४) रोजी पोउपनि सुनिल बिडकर, पोलीस शिपाई शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, सिन्नरकडुन नाशिककडे येणा-या रस्त्यावर एम.एच.०४ एल.क्यु.८५४५ नंबरचे टाटा इन्ट्रा पिकअप निळया रंगाचे वाहन त्यामधे दोन इसम हे गोवंश जातीचे कत्तल केलेल मांस घेवुन विक्री करण्यासाठी घेवुन जात आहेत. अशी माहीती मिळाल्याने ती माहीती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास राजाराम शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सांगितली असता त्यांनी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

 

पोउपनि सुनिल बिडकर व पथकामधील पोलीस अंमलदार यांनी बातमी प्रमाणे कारवाई करून सिन्नर फाटा या ठिकाणी सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने सदर वाहन थांबविले तिचा क्रमांक एच.०४ एल.क्यु. ८५४५ असा आहे. सदर गाडी चालकास व त्याच्या बाजुला बसलेल्या इसमास गाडीच्या खाली उतरण्यास सांगुन त्यांस त्यांचे नाव व पत्ता विचारले असता, सदर वाहन चालविणा-या इसमाने त्याचे नाव १) नासिर शेख अब्बास वय ३२ वर्ष, रा. वैजापुर ता. वैजापुर जि. संभाजीनगर व नासिर याचे बाजुला बसलेल्या ईसमाने त्याचे नाव २) साबीर करीम कुरेशी वय २५ वर्षे रा. वैजापुर ता. वैजापुर जि. संभाजीनगर असे सांगितले त्यांचेकडे ३,५०,००० रू किंमतीचे टाटा इन्ट्रा कंपनीचे एक चारचाकी निळया रंगाचे पिकअप व २,००,०००/- रूपये किमतीचे जनावरांचे कातडी काढलेले मांस त्यात मुंडके व तुकडे केलेले अवयव असा एकुण

 

  • ५,५०,०००/-रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक सचिन बारी आणि नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास राजाराम शेळके, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोउपनि सुनिल बिडकर पोशि शिंदे, कु-हे, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार गोसावी अशांनी यशस्वीरित्या पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!