शांतता समितीमध्ये नवनियुक्त करण्यात आलेल्या युवकांसाठी भिष्मराज हॉल येथे कार्यशाळा संपन्न तरुणांचा उत्सर्फत सहभाग, तत्ज्ञाचे उत्कृष्ठ मार्गदर्शन…!
लाल दिवा – नाशिक,दि.१४: मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतुन शांतता समितीमध्ये स्वच्छेने रजिस्ट्रेशन केलेल्या १८ ते २५ वयोगटातील पदवीत्तर, पदवीधर, शिक्षण घेत असलेले ६२५ तरुणांची भिष्मराज सभागृह, पोलीस मुख्यालय नाशिक येथे मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर तसेच मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, मा. श्री. मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळे दरम्यान शांतता समिती सदस्य म्हणुन कशा स्वरूपाचे कर्तव्य नवनिवयुक्त सदस्य भुमिकेतुन अपेक्षीत आहे याबाबत तज्ञांकडुन मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करतेवेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रीमती डॉ. मृणाल भारद्वाज, उपप्राचार्य, प्रोफेसर व विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग, एल. व्ही. एच कॉलेज नाशिक यांनी मानसशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन केले. सदरवेळी त्यांनी गर्दीचे मानसशास्त्र, समानातील संवेदनशिलता, तद्नुभूती, सहानुभूती वगैरे पैलुवर युवकांना प्रबोधन केले..
त्यानंतर डॉ. श्री. विलास देशमुख, प्राचार्य, एम.एस.डब्ल्यु कॉलेज नाशिक यांनी शांतता समितीची आवश्यकता, समाजातील अशांततेची कारणे, तर्कशास्त्र, संशयशास्त्र, अफवाशास्त्र वगैरे विषय खुमासदार पध्दतीने युवकांना समजावुन दिले. तसेच प्राध्यापक श्री. अशोक सोनवणे यांनी युवक कसा असावा, युवकांचे कर्तव्य, अवयवदान, सामानीक सलोखा याबाबत मार्गदर्शन केले. सदर वेळी विशेष अतिथी म्हणुन प्रसिद्ध रेडीओ जॉकी श्री भुषण मटकरी हे उपस्थित होते. त्यांनी व्हॉट्सअप व इतर सोशल मेडीया चा वापर चांगल्या पध्दतीने कसा करावा वगैरे विषयावर प्रबोधन केले.
दरम्यान मा. पोलीस उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण यांनी शांतता समिती मधील सदस्यांची कर्तव्य बजावतांना युवकांनी पोलीसांचे डोळे आणि कान बनुन पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राबवितांना मदत करावी असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सर्व वक्त्यांचे भाषणांचा परामर्श देवुन मार्गदर्शन केले. तसेच नवनियुक्त युवकांकडुन शांतता समितीमध्ये काम करतांना काय अपेक्षीत आहे याबदल विस्तृत विवेचन केले. तसेच सहा नवनियुक्त शांतता समिती सदस्य यांना प्रतिकात्मक स्वरूपात शांतता समिती सदस्यांचा बॅच प्रदान केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी केले. सुत्रसंचालनाचे काम श्री. शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, द. वि. शा. यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे इतर नियोजनात पोनि. श्री. इरफान शेख, पोलीस कल्याण, रापोनि. श्री. सोपान देवरे, पोलीस मुख्यालय, पोउनि, सचिन वाकडे, सोशल मेडीया सेल नाशिक शहर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता चहापानाने झाली…