भविष्यातील व्याज व कार्यवाही टाळण्याकरिता ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरा – संयुक्त आयकर आयुक्त श्री हर्षद सदाशिव आराधी यांचे प्रतिपादन…!
लाल दिवा-नाशिक,ता.१३: आज रोजी गडकरी चौक येथील आयकर कार्यालयात नाशिक मधील मंगल कार्यालय लॉन्स व हॉल असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद यांच्यासोबत प्रधान आयुक्त श्री शिवराज मोरे यांच्या अध्यक्षते खाली बोलवण्यात आलेल्या बैठकीत संयुक्त आयकर आयुक्त श्री हर्षद आराधी यांनी ॲडव्हान्स टॅक्स बद्दल तसेच मंगल कार्यालय /लॉन्स यांना लागणाऱ्या आयकरा बद्दल मार्गदर्शन केले.
या बैठकीत सर्व सभासदांना ॲडव्हान्स टॅक्सचा तिसऱ्या टप्पाचा कर भरणा करण्याकरीता १५ डिसेंबर ही मुदत असून भविष्यात आयकर विभागाकडून होणारी कार्यवाही अथवा करावर लागणारे व्याज यापासून निश्चिंत होण्याकरीता दिलेल्या मुदतीत ॲडव्हान्स टॅक्सचा भरणा करावा असे आवाहन संयुक्त आयकर आयुक्त श्री हर्षद आराधी यांनी केले..
यावेळी संयुक्त आयकर आयुक्त श्री हर्षद सदाशिव आराधी, आयकर उपआयुक्त श्री संदीप जुमळे, आयकर अधिकारी श्री संजय कुमार सिंह यांनी केले यावेळी नाशिक मंगल कार्यालय लॉन्स व हॉल असोशिएशन नाशिकचे अध्यक्ष श्री सुनिल चोपडा, कार्याध्यक्ष श्री संदीप काकड, श्री सुरेन्द्र कोठवळे व इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.