टिपू सुलतान बद्दल प्रेम असणाऱ्यांनी पाकिस्तानात जाऊन पुतळा बांधावा आ. नीतेश राणे ; आठवण येणाऱ्यांना टिपू सुलतान कडे पाठविण्याची सर्व सोय आम्ही करू : आ. राणे…!
लाल दिवा-धुळे,दि.२५ : धुळे शहरात टिपू सुलतान यांचा पुतळा उभा करू पाहणाऱ्या आमदार फारुक शहाला टिपू सुलतान बद्दल जर एवढेच प्रेम असेल तर त्याने पाकिस्तान मध्ये जाऊन पुतळा बांधावा. त्याला एवढीच जर आठवण येत असेल तर त्याची टिपू सुलतान कडे जाण्याची सर्व सोय आम्ही करू शकतो. अशा प्रकारचे वादग्रस्त विधान भाजपचे आ. नितेश राणे यांनी केल्याने धुळे शहर व परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर सकल हिंदू समाजाने त्यांच्या या विधानाचे स्वागत केले आहे.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, धुळे शहरांमध्ये हिंदु द्वेष्टी टिपू सुलतान च्या पुतळ्यासाठी चौथारा बांधण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी शासकीय निधीचा देखील वापर झाला. या सगळ्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाने मोर्चा देखील काढला. पोलिसांकडे आमची मागणी आहे. की ज्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला त्या आ. फारुक शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हा पैसा आणला कुठून व निधीचा वापर कसा झाला. आमच्या हिंदू राष्ट्रांमध्ये हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न होतोच कसा. या सगळ्यांची चौकशी झालीच पाहिजे. सदर आमदारावर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील आम्ही संपर्कात आहोत. परत आमच्या राज्यात व राष्ट्रात कोणी टिपू सुलतानच देखील नाव घेता कामा नये. एवढी काळजी घेतली जाईल. एवढेच या देशद्रोह्यांना सांगेन. असे ते म्हणाले.
राज्यात सर्वत्र शांततेचे वातावरण असतांना धुळ्याचे आ. फारूक शहा यांनी धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टिपू सुलतान यांचा चौथरा उभारल्याने तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याची काम केले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे धुळे पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली.
सकल हिंदू समाजाने धुळे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाचा आशय पुढीप्रमाणे, धुळे येथील आ. फारुक शहा यांनी शासकीय निधीचा दुरोपयोग केला. टिपू सुलतानचे स्मारक विनापरवानगी उभारून शासकीय यंत्रणा पायदळी तुडवून सकल हिंदू समाजाला डिवचण्याचे काम या आमदाराने केले. धुळे शहरात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी हाच त्यामागचा उद्देश असल्याने त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. सदर बाबीची दखल घेऊन आ. नितेश राणे यांनी आवाज उठविला आहे.
६ जून २०२३ रोजी धुळे शहरातील शंभर फुटी रोडावरील वडजई चौकात मुस्लीम वस्तीत शासनाची कुठलीही परवानगी न घेता आ. फारुख शाह यांनी विनापरवानगी चौथरा बांधून त्याचे टिपू सुलतान चौक असे नामकरण केले. सदर बांधकाम निष्काशित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त (धुळे) यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित ठेकेदार यांचेकडुन तो चौथरा निष्कासित केला. त्यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मिडीया अकाऊंटवर तक्रारदारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुध्द आपत्तीजनक लिखाण करण्यात आले. त्यामुळे धर्मवंश व भाषा आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविण्याचे काम तसेच धार्मिक भावना व धर्माचा हेतुपुरस्पर अवमान करुन सार्वजनिक शांततेविरुध्द खोटी विधान व अफवा प्रसारीत करण्यात आल्या. तसेच मनपाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिपत्याखाली असलेल्या जागेवर विनापरवाना चौथऱ्याचे बांधकाम करुन सार्वजनिक शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले. तक्रारीचा राग मनात धरुन समाजकंटक नासीर खान, आरीफ मिरचीवाले, शाकीब शेख, सरफराज शेख, शेख हाजुसाब, मुस्तकीन शेख, अनिस शेख, अब्दुल सरकार, अबु सुफियान यांनी चौथरा निष्काषित झाल्याने विचलित होऊन मुस्लीम समाजातील लोकांकडुन सोशल मिडीया अकाउंटवर हिंदू बांधवांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे आ. फारुख शहा व अन्य लोकांविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यासंदर्भात आमदार नितेश आणि यांनी दखल घेतली असून सदर आमदारावर गुन्हा दाखल व्हावा याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदर बाप का नाव टाकण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे याबाबत लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा सगळे हिंदू समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.
- चौकट
गेल्या काही महिन्यापूर्वी सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सदर चौथरा काढला. मात्र ज्यांनी चौथरा बांधला. ज्यांनी शासकीय निधी वापरला. अशा कामास प्रशासनाने मात्र त्यांना पाठीशी घातले. त्यांच्यावर मात्र गुन्हा देखील दाखल केला गेला नाही. त्यामुळे समाजात नाराजीचा सूर बघण्यास मिळाला. याबाबात सोमवारी सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. याबाबतची माहिती भाजपा आ. नितेश राणे यांना कळतात त्यांनी मंगळवारी मिडियाशी बोलताना सदर घटनेला वाचा फोडली.