खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या दोन गुन्हयातील पाहिजे आरोपीस घेतले ताब्यात
लाल दिवा-नाशिक,ता.१ : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साो, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात खंडणीचे गुन्हे करणा-या इसमाच्या विरुध्द कारवाई व पाहिजे आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने दि.०१/०६/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर कडील सहा. पोलीस उप निरीक्षक दिलीप सगळे व खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार असे पवन नगर, नाशिक परिसरात खंडणीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध व गुन्हे प्रतिबंध गस्त करित असताना खंडणी विरोधी पथकाचे पोशि मंगेश प्रकाश जगझाप व भुषण मोठाभाउ सोनवणे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने खंडणीच्या गुन्हयातील पाहिजे असेलेला आरोपी हा श्रीनिवास हॉटेल जवळ, गणेश एग्ज दुकानाच्या जवळ, पवन नगर, नाशिक येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळालेली होती.
सदर गोपनीय माहिती वरून सहा. पोलीस उप | निरीक्षक श्री. दिलीप सगळे व पथकातील अंमलदार यांनी श्रीनिवास हॉटेल जवळ, गणेश एग्ज दुकानाच्या जवळ, | पवन नगर, नाशिक येथे जावुन इसम नामे अजय नामदेव ठाकुर, वय ४४ वर्षे, रा. सरस्वती विदयालय जवळ, विखे पाटील स्कुल, कामटवाडा, फ्लॅट नंबर ६, लोटस आशिर्वाद पार्क, श्री. मयुर प्रभाकर देवरे यांच्या घरात भाडे तत्तवार, वंदावन नगर, प्लॉट नं १३, सर्व्हे नं २३/१/अ, डी.जी.पी. नगर, माउली लॉन्स, नाशिक यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे खंडणीच्या गुन्हयां बाबत विचारपुस करता त्यांने गंगापुर पो. स्टे. व सरकारवाडा पो.स्टे. हददीत खंडणी मागणीचे गुन्हे केले असल्याचे निष्पण्ण झाले. तेव्हा गंगापुर पोलीस | स्टेशन गु. रजि. नं । १८४/२०२२, भा. द. वि. कलम ३८५, ५०६ प्रमाणे व सरकारवाडा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 1 १५४ / २०२२, भा.द. वि. कलम ३८४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानेच ते दोन्ही गुन्हे केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई करिता रिपोर्टाने गंगापुर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई गंगापुर पोलीस स्टेशन करित आहे.