गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे पंकज भालेराव यांची दमदार कामगिरी……. तिरट जुगार खेळणाऱ्यावर केली कारवाई…… कारवाईबाबत नागरिकांमध्ये समाधान…!
लाल दिवा-नाशिक,ता . २६: दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी रात्री ८.०० वाजेचे सुमारास पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हद्दीत मखमलाबाद काकड मळा, येथे इसम नामे सुरेश मुरलीधर काकड हा तिरट नावाचा जुगार खेळतो व खेळवितो अशी बातमी श्रेणी पोउनि / दिलीप सगळे व पोहवा /१०६ किशोर रोकडे यांना मिळाली. बातमीचे अनुषंगाने विशेष पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज प्रल्हाद भालेराव यांनी पथकाचे सुयोग्य नियोजन करून काकड मळा, मखमलाबाद येथे जावुन बातमी प्रमाणे खात्री करता, सुरेश मुरलीधर काकड हा त्यांचे घराचे पाठीमागे वॉलकंम्पाऊंड जवळ मोकळया जागेत, जुना चांदशी रोड, मखमलाबाद, नाशिक या ठिकाणी काही इसमांना एकत्र जमवून पत्त्याचा जुगार खेळत असतांना दिसुन आला.
त्यांचे वर छापा टाकुन इसम नामे १) सुरेश मुरलीधर काकड वय ५१ वर्षे राह. मानसी महल, संभाजी चौक, मेनरोड, मखमलाबाद ता.जि. नाशिक. २) स्वप्नील रमेश मानकर, वय ३० वर्षे, राह. मानकर मळा, मखमलाबाद रोड, ता. जि. नाशिक. ३) अनिल जगन्नाथ मानकर, वय ५३ वर्षे, राह. राम मंदिराचे समोर, मखमलाबाद, नाशिक. ४) दत्तु किसन सुर्यवंशी, वय ४३ वर्षे, राह. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद, ता. जि. नाशिक. ५) भगवान मोतीराम काकड, वय ४० वर्षे, राह. घ.न.९८६ मखमलाबाद, ता. जि. नाशिक, ६) रविकांत गणपत गामणे, वय ४० वर्षे, राह. कुंभार गल्ली, मखमलाबाद, ता. जि. नाशिक. ७) अक्षय सुनिल काकड, वय ३८ वर्षे राह. मानकर मळा, मखमला बाद, ता.जि. नाशिक.८) विश्वनाथ प्रकाश काकड, वय ४६ वर्षे, राह. मानकर मळा, मखमलाबाद, ता.जि. नाशिक. ९) प्रकाश देवराम पिंगळे, वय ४० वर्षे, राह. मखमलाबाद, ता. जि. नाशिक. १०) विशाल ज्ञानेश्वर काकड, वय ३४ वर्षे, राह. मखमलाबाद, ता.जि. नाशिक. ११) सुनिल रघुनाथ काकड, वय ५० वर्षे, राह. काकड मळा, मखमलाबाद, ता.जि. नाशिक. जागीच पकडले त्यांचे कडून ७६, २२० रू रोख, व ७८,००० रू कि. चे मोबाईल तसेच २७,९०,००० रु च्या चारचाकी कार असा एकुण २९,४४,९०,००० रू. कि.चा मुद्देमाल जागीच जप्त करून पोअ/२३८९ भगवान एकनाथ जाधव यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कार्यवाही होणे कामी म्हसरूळ पोलीस ठाणे, येथे नमुद आरोपी व जप्त मुद्देमाल रिपोर्टाने हजर केले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे वपोनि/पंकज भालेराव, श्रेणी पोउनि दिलीप भोई, श्रेणी पोउनि / दिलीप सगळे, पोहवा /१०६ किशोर रोकडे, पोहवा /१४९७ भामरे, पोहवा /१७४९ डंबाळे पोना/४९७ भुषण सोनवणे, पोना/५६१ योगेश चव्हाण, पोना/१५३३ दिघे, पोअ/२३८९ भगवान जाधव, मपोह/१६१५ जगताप, मपोअ/२३६६ भड, मपोअ/८१० कदम सर्व नेम. विशेष पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर या पथकाने, कामगिरी केलेली आहे.