जिवंत गोवंश गायींची कत्तल करण्यासाठी वाहतुक करणारा इसम जेरबंद.
गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी
पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांनी अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतुक/विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्या अंनुषगाने दि. २०/०३/२०२४ रोजी युनिट क. १, नाशिक शहर कडील पोलीस हवालदार रमेश कोळी यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची मिळाली होती. त्यावर आज पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/गजानन इंगळे, पोहवा रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, पोअं जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार अशा पथकानी व भद्रकाली पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोअं सोनवणे अशांनी बीरबल आखाडा याठिकाणी सापळा लावुन संशयीत टाटा कंपणीचा छोटा हत्ती क्रमांक एम.एच. १५ सी. के ९५६२ या मधील इसम नामे सद्दाम अन्वर पाटकरी, वय ३३वर्षे, रा-घर नं २६०५ जोगवाडा, मुलतानपुरा, भद्रकाली यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे ताब्यातील छोटा हत्तीमध्ये एक तपकीरी रंगाची गाय व एक काळया व पांढ-या रंगाची गाय बेकायदेशीर पणे कत्तल करण्याचे उददेशाने घेवुन जात असतांना मिळून आला. पंचासमक्ष पंचनामा करून वाहनासह एकुण ३,२५,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवुन सदर इसमाविरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम स.न. १९७६ चे कलम ५ व ९ तसेच भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाणेस फिर्याद देवून त्यांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाणेचे ताब्यात पुढील कारवाईकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, पोउनि / गजानन इंगळे, पोहवा/रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, पोअं/जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, चापोअं/समाधान पवार तसेच भद्रकाली पोलीस ठाणे कडील सपोउनि / गांगुर्डे व पोअं/सोनवणे अशांनी संयुक्तपणे केलेली आहे.